nasrin.jpg 
ग्लोबल

पुरुषांच्या कपड्यांचा महिलांवर परिणाम होणारच!

गोमंन्तक वृत्तसेवा

इस्लामाबाद: पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांवी केलेल्या विधानावरुन बांग्लादेशच्या (Bangladesh) बंडखोर लेखिका तस्लिमा नसरिन (Taslima Nasrin) यांनी अगदी सडेतोड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. इम्रान खान यांचे तरुणपणातील शर्ट घातले नसतानाचे फोटो नसरिन यांनी सोशल मिडियावरील (Social media) ट्विटरवरुन पोस्ट केले. स्त्रीयांनी फारच कमी कपडे घातल्यास त्याचा परिणाम पुरुषांवर होईलच. ते रोबोट नसतील तरच हे अपवादात्मक होऊ शकते. हा एक कॉमन सेन्स आहे, असे इम्रान खान म्हणाले होते. एचबीओ अॅक्सीऑस वाहिनीच्या जोनाथन स्वान (Jonathan Swann) यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महिलांविरुध्दच्या लैंगिक हिंसाचार रोखण्याबाबत त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, आमच्या देशामध्ये अश्लीलतेमुळे लहान मुला-मुलींचे लैंगिक शोषण होत आहे. हे टाळण्याचा एक मार्ग म्हणजे समाजात आकर्षित करणारी कारणे टाळायला हवीत. (Mens clothing will affect women)

एप्रिल महिन्यामध्ये इम्रान खान यांनी संसदेमधील प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये असेच मत व्यक्त केले होते. पर्दा पध्दतीचा उल्लेख करत खान म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये समाज आणि जीवनपध्दती ही पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे मोहात पाडण्याचे प्रमाण एका पातळीच्या पुढे नेले  तर या तरुण मुलांना काहीही करता येणार नाही. त्याचे परिणाम हे समाजामध्ये उमटणारच.

याविषयी इम्रान खान पुढे म्हणाले, तुम्ही ज्या समाजामध्ये राहत असता त्यावर ते बरचसे अवलंबून आहे. जर तुमच्या समाजाने अशा गोष्टी पाहण्यात आल्या नसतील तर त्यांच्यावर परिणाम हा होणे अटळ असेल.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT