Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake: मेघालयात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता

यापूर्वी महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

दैनिक गोमन्तक

मेघालयमध्ये  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 3.46 वाजता राज्यातील तुरापासून 37 किमी पूर्व-ईशान्य दिशेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली. 

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. बुधवार 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह (Maharashtra) अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. महाराष्ट्रातील नाशिकमधील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या पश्चिमेला ८89 किमी असून तो जमिनीपासून 5 किमी खोलीवर होतं. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

  • भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?

भूकंपाचे धक्के जाणवल्यावर सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT