भारतात सध्या सुरु असलेल्या हिजाब वादादरम्यान पाकिस्तानमधून (Pakistan) एक विचित्र घटना समोर आली आहे. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाने व्हॅलेंटाइन डे संदर्भात आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक फर्मान जारी केले आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाने (Medical College) मुलींना हिजाब घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, मुलांना मुलींपासून (Girls) दोन मीटरचे अंतर राखण्यास सांगण्यात आले आहे. मुलांनी पांढऱ्या टोप्या घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, टाइम्स वृत्तपत्राने शुक्रवारी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, इस्लामाबादच्या (Islamabad) इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजने शनिवारी एक परिपत्रक जारी केले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी एकत्रित सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर व्हॅलेंटाइन डे (Valentine's day) शी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही मनाई आहे. सर्व विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. या ड्रेस कोडनुसार विद्यार्थिनींना हिजाबने आपले डोके, मान आणि छाती व्यवस्थित झाकणे आवश्यक असणार आहे.
तसेच, एवढयावरच न थांबता कॉलेजने जारी केलेल्या ड्रेस कोडनुसार सर्व विद्यार्थ्यांना पांढऱ्या टोप्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्यासाठी कॉलेजचे कर्मचारी परिसरात गस्त घालतील, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या आदेशांचे म्हणजेच ड्रेस कोडचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 1996 मध्ये स्थापन झालेल्या रिफा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीशी संलग्नित वैद्यकीय महाविद्यालय आहे.
शिवाय, व्हॅलेंटाईन डेला सेंट वेलेंटाइन डे (Saint Valentine's Day) देखील म्हणतात. तो दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. वर्षानुवर्षे हा जगभरातील प्रणयाचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव बनला आहे. तसेच, पाकिस्तानमधील विद्यार्थिनींसाठी अशा ड्रेस कोडच्या सूचना कॉलेजने जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानातून अशा अनेक घटना याआगोदरही समोर आल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.