Boat Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Mauritania Boat Accident: उत्तर आफ्रिकन देश मॉरिटानियाजवळ एक मोठी बोट दुर्घटना घडली. स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याने 49 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

Mauritania Boat Accident: उत्तर आफ्रिकन देश मॉरिटानियाजवळ एक मोठी बोट दुर्घटना घडली. स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याने 49 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॉरिटानियाच्या तटरक्षक दलाने ही माहिती दिली. या घटनेनंतर अनेक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

मॉरिटानियाच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट गाम्बिया देशातून निघाली होती. ती मंगळवारी सकाळी महेज्रात किनाऱ्याजवळ पोहोचली असता ही दुर्घटना घडली. एका आठवड्यापूर्वी ही बोट गाम्बियामधून निघाली होती आणि त्यात जवळपास 160 लोक होते. त्यात सेनेगल आणि गाम्बिया या देशांच्या नागरिकांचा समावेश होता, अशी माहिती तटरक्षक दलाचे प्रमुख मोहमद अब्दल्लाह यांनी दिली.

बोट उलटण्याचे कारण सांगताना त्यांनी म्हटले की, “जेव्हा स्थलांतरितांनी महेज्रातच्या किनाऱ्यावरचे दिवे पाहिले, तेव्हा त्यांना किनारपट्टी जवळ आल्याचे समजले. या आनंदात आणि किनाऱ्यावर लवकर पोहोचण्याच्या घाईत सगळे लोक बोटीच्या एकाच बाजूला धावू लागले, त्यामुळे बोटीचा तोल जाऊन ती उलटली.” बोटीवरील लोकांचा आशावादच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे यातून दिसून येते.

मृतांचा आकडा 49 पर्यंत, 17 लोकांना वाचवण्यात यश

दरम्यान, या दुर्घटनेनंतर समुद्रात बचाव आणि शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 49 मृतदेह किनाऱ्यावर सापडले आहेत. तसेच, मदत कार्यादरम्यान फक्त 17 लोकांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. याव्यतिरिक्त, अजूनही अनेक लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव दल प्रयत्न करत आहे. समुद्राच्या लाटा आणि हवामानामुळे मदतकार्यात अनेक अडचणी येत आहेत.

ही दुर्घटना स्थलांतरितांच्या जीवनातील धोके अधोरेखित करते. आफ्रिकेतून युरोपला (Europe) जाण्यासाठी अनेक स्थलांतरित असे धोकादायक मार्ग निवडतात आणि अनेकदा अशा दुर्घटनेला बळी पडतात. या घटनेने पुन्हा एकदा जगभरातील स्थलांतरितांच्या प्रश्नाची आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासाची गंभीर समस्या समोर आणली आहे. या दुर्दैवी घटनेने अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

Viral Video: “मी मन पाहून प्रेम करते!” म्हणणाऱ्या मुलीला पठ्ठ्याचं जबरदस्त उत्तर, व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक; म्हणाले...

SCROLL FOR NEXT