13 people killed, 35 injured in night club fire Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand: बँकॉकच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग, 13 ठार, 35 जखमी

राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला थायलंडच्या चोनबुरी प्रांतातील एका नाईट क्लबला आज शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली.

दैनिक गोमन्तक

Thailand: थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला चोनबुरी प्रांतातील एका नाईट क्लबला आज शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती बँकॉकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (Thailand Nightclub Fire)

पोलीस कर्नल वुटीपॉन्ग सोमजाई यांनी दूरध्वनीवरून सांगितले की, सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये सकाळी 1.00 वाजता आग लागली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे थाई असल्याचे सांगितले जात आहे.

बचाव सेवेने पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये काही नागरिक क्लबमधून किंचाळत पळत असल्याचे दिसून आले आहे, प्रचंड आग लागल्याने त्यांचे कपडे पेटले गेले.क्लबच्या भिंतींवर ज्वालाग्राही ध्वनिक फोममुळे आग वाढली आणि ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

मृतांमध्ये चार महिला आणि नऊ पुरुषांचा मसावेश आहे. बहुतेक लोकं प्रवेशद्वाराजवळ आणि बाथरूममध्ये आढळले त्यांचे शरीर गंभीरपणे जळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. फ्लू टा लुआंग पोलीस स्टेशनचे पोलीस लेफ्टनंट कर्नल बूनसॉन्ग यिंगयोंग यांनी, ज्या ठिकाणी आग लागली त्या भागाचे निरीक्षण करणारे पोलीस लेफ्टनंट कर्नल बूनसॉन्ग यिंगयोंग यांनी फोनवरून एएफपीला हि माहिती दिली.

थायलंडच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या नियमांबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल शंका घेत बार आणि नाइटक्लबमध्ये झालेल्या अपघातानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. 2009 मध्ये बँकॉकच्या चित्तथरारक सांतिका क्लबमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पार्टीत भडकलेल्या आगीत 67 लोक ठार झाले आणि 200 हून अधिक जखमी झाले होते.स्टेजवर बर्न नावाचा रॉक बँड वाजवताना फटाके सोडण्यात आले होते आणि आग लागली होती. त्यानंतर क्लब मालकाला तीन वर्षांचा तुरुंगवास झाला होता. अलीकडे,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT