Massive Bomb Blast In Peshawar Dainik Gomantak
ग्लोबल

Peshawar Bomb Blast: नव्या राष्ट्रपतींची निवड होताच पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट; बॉम्बस्फोटात 2 जणांचा मृत्यू

Massive Bomb Blast In Peshawar: नवीन राष्ट्रपतींची निवड होताच पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी हा बॉम्बस्फोट झाला.

Manish Jadhav

Massive Bomb Blast In Peshawar: नवीन राष्ट्रपतींची निवड होताच पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी हा बॉम्बस्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा पक्ष पीपीपी यांचे संयुक्त राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आसिफ अली झरदारी यांनी शनिवारी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला असताना हा स्फोट घडला आहे. ते आज दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती झरदारी यांच्या शपथविधीपूर्वी खैबर पख्तुनख्वामध्ये स्फोट घडवून दहशतवाद्यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांत हा दहशतवाद्यांचा गड मानले जातो. काही दिवसांपूर्वीच येथे झालेल्या बॉम्बस्फोटात अनेकांचा बळी गेला होता. ताजी घटना नसीर बाग रोड येथील बोर्ड मार्केटमध्ये घडली.

हा बॉम्ब मोटारसायकलमध्ये फिट आला होता

हा बॉम्ब मोटारसायकलमध्ये फीट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचे मृतदेह आणि जखमींना खैबर टीचिंग हॉस्पिटलमध्ये तात्काळ भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात उभ्या असलेल्या एका मोटारसायकलमध्ये बॉम्ब फिट करण्यात आला होता. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, घटनास्थळाची नाकेबंदी करण्यात आली आहे आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या स्फोटाचा निषेध केला असून पोलिसांकडून या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.

जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या बैठकीत मोठा स्फोट झाला होता

याआधी जुलै महिन्याच्या अखेरीस एका मोठ्या बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला होता. या बॉम्बस्फोटात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोटामुळे 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामधील बाजौर भागात जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) ची बैठक सुरु होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले होते. कार्यक्रम सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT