Maria Branyas Moreira, the world's oldest person, recently celebrated her 117th birthday. X, Guinness World Records
ग्लोबल

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे 117 व्या वर्षात पदार्पण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिल्या खास शुभेच्छा

Oldest Person In The World: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, मोरेरा यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. यानंतर, वयाच्या आठव्या वर्षी त्या आपल्या कुटुंबासह स्पेनमध्ये आल्या.

Ashutosh Masgaunde

Maria Branyas Moreira, the world's oldest person, recently celebrated her 117th birthday:

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीने नुकताच तिचा 117 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

स्पेनमधील कॅटालोनियामध्ये राहणाऱ्या मारिया ब्रान्यास मोरेरा सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, (Guinness World Records) मोरेरा यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. यानंतर, वयाच्या आठव्या वर्षी त्या आपल्या कुटुंबासह स्पेनमध्ये आल्या.

गेल्या 22 वर्षांपासून त्या रेसिडेन्सिया सांता मारिया डेल तुरा नावाच्या नर्सिंग होममध्ये राहत आहेत.

मोरेरा यांचे स्वतःचे ट्विटर अकाउंटदेखील आहे, जे त्या मुलीच्या मदतीने अपडेट करत राहतात.

एका पोस्टमध्ये आपल्या दीर्घायुष्याचे कारण स्पष्ट करताना मोरेरा यांनी लिहिले की, 'माझे दीर्घायुष्य अंशतः सुव्यवस्था, शांतता, कुटुंब आणि मित्रांसोबत चांगले संबंध, निसर्गाशी संपर्क, भावनिक स्थिरता, कोणतीही काळजी किंवा पश्चात्ताप यामुळे असू शकते. सकारात्मकतेसाठी वाईट लोकांपासून दूर राहणे आणि भाग्यवान असणे देखील महत्त्वाचे आहे.'

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जानेवारी 2023 मध्ये मोरेरा यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा किताब बहाल केला होता. त्यांच्या आधी, हा विक्रम फ्रान्समधील रहिवासी असलेल्या लुसिली रँडन यांच्या नावावर होता, ज्यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन झाले होते.

वयामुळे त्यांची दृष्टी गेली होती आणि त्या व्हीलचेअरवर बसायच्या. असे असूनही त्यांनी आपल्यापेक्षा लहान मोठ्यांची काळजी घेतली. रँडनला सिस्टर आंद्रे या नावानेही ओळखले जाते होते.

मोरेरा यांच्या पतीचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना तीन मुले होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांना 11 नातवंडे आणि 11 पणतू आहेत.

मोरेरा यांची सर्वात लहान मुलगी 78 वर्षांची आहे. ती म्हणते, "माझ्या आईला कधीही रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. 2019 मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही तिने स्वत:ला तिच्या खोलीत बंद करून घेतले आणि तिच्या सामान्य दिनचर्येने स्वत:ला बरे केले."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT