Pakistan Bus Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bus Accident: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण अपघात; सहा ठार, 50 जखमी

Pakistan Bus Accident: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी एक हायस्पीड बस उलटली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत.

Manish Jadhav

Pakistan Bus Accident: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी एक हायस्पीड बस उलटली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. ही बस एका धार्मिक मेळाव्यासाठी ख्रिश्चन यात्रेकरुंना घेऊन जात होती. लाहोरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखूपुरामध्ये हा अपघात झाला.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मरियमाबाद येथील नॅशनल मारियन श्राइन येथे एका धार्मिक मेळाव्यासाठी ही बस ख्रिश्चन यात्रेकरुंना घेऊन जात होती.

शेखूपुरा येथील खंका डोगराण येथे एका वळणावर बस उलटली. पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

दरम्यान, सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. बसमध्ये क्षमतेपेक्षा 60 प्रवासी अधिक होते. वळण घेत असताना चालकाचा वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटले.

दुसरीकडे, पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांनी अपघातातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना उपचार देण्याचे निर्देश आरोग्य अधिकार्‍यांना दिले.

मरियमाबादमधील राष्ट्रीय मारियन तीर्थ हे 1949 पासून मेरीचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. मरियमाबादला 'मेरी सिटी' म्हणूनही ओळखले जाते.

तसेच, पाकिस्तानमध्ये (Pakistan) रस्ते अपघात हे नेहमीचेच झाले आहेत. ऑगस्टमध्ये, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इंधन टाकी घेऊन जाणारी पिक-अप व्हॅन आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या धडकेत 18 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT