USA: अमेरिकेत भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंगने न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे.याबरोबरच त्या अमेरिकेतील पहिल्या शिख न्यायाधीश बनल्या आहेत. महिलांसाठी ही मोठी बाब असल्याचे म्हणत अमेरिकेतसुद्धा मोनिका यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.सध्या त्या बेलेयर येथे राहतात. (Manpreet Monica Singh First Female Sikh judge in the US)
1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मोनिका यांचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. मागच्या 20 वर्षापासून वकील असण्याबरोबरच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर नागरिकांच्या अधिकारासांठी त्यामनी आवाज उठवला आहे. माजी न्यायाधीश इंडो-अमेरिकी( USA )न न्यायाधीश रवि सैंडिल यांनी शिख समुदायासाठी मोठी बाब असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मनप्रीत केवळ शीख समुदायासाठी नाही तर सगळ्या रंगाच्या महिलांसाठी प्रेरणा असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.