Maldives President Mohamed Muizzu Dainik Gomantak
ग्लोबल

India-Maldives Row: ''...आम्हाला धमकावण्याचं कोणाकडेही लायसन्स नाही''; चीनहून परताच मालदिवच्या अध्यक्षाचा भारतावर निशाणा

Maldives President Mohamed Muizzu: मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर मायदेशी परतले आहेत.

Manish Jadhav

Maldives President Mohamed Muizzu: मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर मायदेशी परतले आहेत. मालदीवमध्ये परत येताच त्यांनी आम्हाला धमकावण्याचे लायसन्स कोणाकडेही नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मुइज्जू म्हणाले की, 'आम्ही एक छोटा देश असू शकतो पण त्यामुळे आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणालाही मिळत नाही.' चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मुइज्जू यांनी पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल निलंबित करण्यात आले असताना त्यांचा हा दौरा झाला. या मुद्द्यावरुन भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक तणाव वाढत आहे.

दरम्यान, मालदीववर बहिष्कार घालण्याच्या भारतात सुरु असलेल्या ट्रेंडमध्ये मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक चिनी पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुइज्जू म्हणाले होते की, कोविडपूर्वी आपल्या देशात येणारे बहुतेक पर्यटक हे चीनचे होते. मी विनंती करतो की चीनने यासाठी पुन्हा प्रयत्न तीव्र करावेत.

मुइज्जू यांची पहिली चीन भेट वादग्रस्त का होती?

मुइज्जू यांचा हा पहिला चीन दौरा होता. ही भेट अशा वेळी झाली जेव्हा मालदीवच्या तीन मंत्र्यांनी लक्षद्वीप दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंबाबत सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर या प्रकरणाने सोशल मीडियावर जोर पकडला. या प्रकरणाला वेग आला तेव्हा मालदीव सरकारने तीन आरोपी मंत्र्यांना निलंबित केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील मालदीवच्या दूतावासाला बोलावून या प्रकरणावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव वाढले.

मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सुमारे 75 भारतीय सैनिकांची तुकडी काढून टाकण्याचे वचन दिले होते. भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारत आणि मालदीव यांनी एक कोअर ग्रुप तयार केला आहे. मुइज्जू यांचा नारा 'इंडिया आउट' होता. मालदीवच्या 'इंडिया फर्स्ट पॉलिसी'मध्ये बदल करण्याबाबतही ते बोलले होते. तर भारत आणि चीन हे दोन्ही देश मालदीवमध्ये प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

वाद काय आहे?

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींच्या दौऱ्यातील काही फोटोंवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद अधिक गडद झाला आहे. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuarinagar Raid: कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना कोट्यवधींचा गंडा; झुआरीनगरातील कॉल सेंटरचा पर्दाफाश

Goa Eco Sensitive Zone: गावे वगळण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांची धडपड! केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची घेतली भेट; पाहणी दौऱ्यासाठी पथक दाखल

Goa Politics: मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत, चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाचा मात्र इन्कार

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Rashi Bhavishya 26 November 2024: कुंटुबात आनंदाचे वातावरण राहील, पण बोलण्यावर ताबा ठेवा... काय सांगयतं 'या' राशीचं भविष्य?

SCROLL FOR NEXT