Love Story Dainik Gomantak
ग्लोबल

Malaysian Love Story: 'तू है तो मुझे फिर और क्या चाहिए...' मलेशियन युवतीने बॉयफ्रेंडसाठी सोडली 2500 कोटींची संपत्ती

दैनिक गोमन्तक

Malaysian Love Story: शेक्सपीयर म्हणून गेला लव्ह इज ब्लाईंड. याची प्रचिती आजुबाजूंच्या घटनांमधून अनेकदा येत असते. प्रेमासाठी कोणी कोट्यवधींच्या संपत्तीवर पाणी सोडल्याचे तुम्ही पाहिले आहे का? नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. एका मलेशिअन युवतीने आपल्या प्रेमाखातीर करोडोंच्या संपत्तीचा मोह बाजूला सारत प्रियकराला कवठाळले आहे. यातून प्रेम करणाऱ्यांसाठी ती एक आदर्श उदाहरण बनली आहे.

या मुलीचे नाव अजेंलिन फ्रान्सिस असे असून ती मलेशियातील प्रसिद्ध बिझनेस टायकून खे काय पेंग आणि मिस मलेशिया स्पर्धेची माजी विजेती पाउलिन चाय यांची मुलगी आहे. आपला बॉयफ्रेंड जेदिदिह फ्रान्सिस याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तिने वारसाहक्काने मिळणाऱ्या ३०० मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 2,484 कोटींची संपत्ती नाकारली आहे.

2008 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना ती मूळच्या कॅरेबियन असलेल्या डाटा सायंटिस्ट जेदिदिह फ्रान्सिसला भेटली. काही वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर तिने जेव्हा आपल्या पालकांना जेदिदिहबरोबरच्या नात्याबद्दल सांगितले आणि लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा तिच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.

पेंग यांच्या 5 अपत्यांपैकी चौथी मुलगी म्हणजेच अंजेलिन जेदिदिह. ती लग्नाआधी आपला फॅमिली बिझनेस सांभाळत होती. पेंगचे वडील देखील मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. ते मलायन युनायटेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असून, त्यांच्या कंपनीची इंग्लंडमधील प्रख्यात ब्रँड लॉरा अॅशलेमध्ये मोठी भागीदारी आहे.

अंजेलिनने तिला वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्ती आणि फॅमिली बिझनेसला सोडून प्रेमाला निवडल्याने तिच्या या निर्णयाची चर्चा होत असतानाच कौतुकही होत आहे.

प्रेमात पडणे सोपे असते मात्र ते शेवटपर्यत निभावणे कठीण असते. प्रेम तुमच्याकडून वेळोवेळी संयम आणि त्यागाची अपेक्षा करत असते. अनेकजण आपापल्या जोडीदाराला वचन देत असतात मात्र जेव्हा निर्णायक वेळ येते तेव्हा परिस्थितीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतात. अँजेलिनच्या उदाहरणाने मात्र अनेक प्रेमवीरांना बळ दिले आहे.

काहीजण मात्र प्रामाणिकपणे प्रेम करतात आणि निष्ठेने निभावण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. आपल्या जोडीदाराबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी ते आपल्या कुटुंबाला सोडायलादेखील तयार असतात.

आता अंजेलिनने प्रेमात असणाऱ्या जोडप्यांसमोर एक नवीन उदाहरण तयार केले आहे आणि अनेकांना प्रेमावर विश्वास ठेवायला भाग पाडत अनेकांचा आदर्श बनली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT