Pakistan Airlines Plane  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: आधीच हातात भिकेचा कटोरा, आता थकबाकी न भरल्याने विमान जप्त; मलेशियानं PAK ला दिला दणका

Pakistan: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे.

खरेतर, आपला इस्लामिक मित्र म्हणवणाऱ्या मलेशियाने पुन्हा एकदा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (PIA) बोईंग 777 पॅसेंजर जेट विमानाला थकबाकी न भरल्याबद्दल जप्त केले आहे. दोन्ही देशांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे, त्यानंतरही मलेशियाने पाकिस्तानला मोठा दणका दिला.

एका अहवालानुसार, बोईंग 777 विमान PIA ने मलेशियाकडून (Malaysia) भाडेतत्त्वावर घेतले होते. 4 दशलक्ष डॉलर्सची थकबाकी न भरल्यामुळे प्रवासी जेट जप्त करण्यात आले आहे. मलेशियाने क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाकिस्तानचे विमान ताब्यात घेतल्याचे सांगितले.

मलेशियाने 2021 मध्येही पाकिस्तानचे विमान जप्त केले होते

बोईंग 777 हे विमान पीआयएने मलेशियाकडून भाडेतत्त्वावर घेतले होते. BMH नोंदणी क्रमांक असलेले विमान दुसऱ्यांदा क्वालालंपूर विमानतळावर थकबाकी न भरल्यामुळे जप्त करण्यात आले. थकबाकी भरण्याबाबत स्थानिक न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर जप्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी, मलेशियाने याच मुद्द्यावर 2021 मध्ये क्वालालंपूर विमानतळावर PIA चे विमान जप्त केले होते. नंतर देय रक्कम देण्याचे राजनैतिक आश्वासन देऊन विमान सोडण्यात आले होते. जप्त केलेले पीआयए विमान 27 जानेवारी रोजी 173 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह पाकिस्तानला परत आणण्यात आले होते.

विमान कंपनीची आर्थिक स्थिरता ढासळली

गेल्या दोन वर्षांत दोनदा विमान जप्त केल्याने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्ससमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. कामकाजावर वारंवार परिणाम होत असल्याने भाडेपट्ट्याचा प्रश्न त्यांना अंगावर काटा आणत आहे.

विमान कंपनीची आर्थिक स्थिरता डळमळीत आहे. पीआयए अधिकार्‍यांनी अद्याप जप्ती आणि वाद सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जातील यावर भाष्य केलेले नाही.

दुसरीकडे, पाकिस्तान (Pakistan) सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. लोकांना पोट भरण्यासाठी भाकरीही मिळत नाही. तर महागाईने कळस गाठला आहे. लोक अन्नाविना मरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT