Pakistan Economic Crisis Latest Update: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आणि चीनचे संबंध खूप चांगले आहेत, पण जेव्हा पाकिस्तान आर्थिक हालाखीच्या मार्गावर उभा आहे, तेव्हा चीन मदतीसाठी पुढे येत नाही.
तर, 2015 मध्ये जेव्हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) लाँच करण्यात आला, तेव्हा पाकिस्तानच्या (Pakistan) अर्थव्यवस्थेला चीनप्रमाणेच मोठा फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्याआधीच दोन्ही देशांमध्ये अंतर आले आहे, तर सुरुवातीला हा प्रकल्प म्हणजे दोन्ही देशांमधील मैत्रीची ओळख असल्याचे वर्णन केले जात होते.
पाकिस्तानच्या आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता एकूण कर्जापैकी केवळ 25 टक्के कर्ज चीनचे आहे. याशिवाय पाकिस्तानची राजकीय स्थितीही चांगली नाही. तसेच, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाकिस्तान आणि चीनमधील (China) संबंध ताणले गेले आहेत, त्यामुळे चीन मदतीसाठी पुढे येत नाही.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सक्रिय झाले असून त्यांनी दहशतवादी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. सीपीईसीच्या कामात गुंतलेल्या चिनी नागरिकांवर टीटीपीने हल्ला केला. यासोबतच स्थानिक लोकांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी ग्वादर आंदोलन सुरु केले, ज्याचा परिणाम सीपीईसी प्रकल्पावर झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि बंदर विकसित केले जाणार होते, परंतु आज पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्प रखडले आहेत. एवढेच नाही तर सीपीईसीचा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
चीनची इच्छा असेल तर तो पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे आणि याचे काही संकेतही मिळाले आहेत. चीन पाकिस्तानला सुमारे 15 अब्ज डॉलर्स देण्याच्या विचारात आहे, परंतु सध्या पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती लक्षात घेता परिस्थिती जैसे थे आहे. चीन परिस्थिती सुरळीत होण्याची वाट पाहत आहे, निवडणुकीनंतर निर्णय घेऊ शकतो. त्याचवेळी, पाकिस्तान मदतीसाठी पाश्चिमात्य देशांकडे पाहत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.