honcong.jpg 
ग्लोबल

हॉंगकॉंग सरकारचा मोठा निर्णय; 12 वर्षावरील मुलांचं होणार लसीकरण

गोमंन्तक वृत्तसेवा

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना हॉंगकॉंगमध्ये आता 12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. हॉंगकॉंग सरकारने(Hong Kong Government) लसीकरणाला मान्यता देत म्हटले की, जर्मन बनावटीची बायोएनटेक लस (Bioentech vaccine) 12 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. 18 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांसाठी सध्या चीनी बनावटीची सिनेव्हॅक (Cinevac) लस दिली जात आहे. सुमारे 75 लाख लोकांसाठी हॉंगकॉंग सरकार ही लसीकरणासाठी मोहीम राबवत आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आल होता. आतापर्यंत 14 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (A major decision by the Hong Kong government Children above 12 years will be vaccinated)

आरोग्य सचिव सोफिया चॅन(Sophia Chan) यांनी गुरुवारी बायोएनटेक लसीद्वारे लसीकरण मोहिमेला अधिक वेग येणार असल्याचे म्हटले. सरकार आता 12 वर्षावरील मुलांचं लसीकरण करणार आहे. 

चॅन पुढे म्हणाल्या, 'नव्या कोरोना स्ट्रेनपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी लसीकरण मदत करणार आहे.'

आतापर्यंत हॉंगकॉंगमध्ये जवळपास 11,800 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 210 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लसीकरणामुळे कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. एप्रिलमध्ये 16 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचा लसीकरणामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी वित्तीय संस्था तसेच व्यवसांयिकावर सरकारने दबाव आणला होता. त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला लसीकरणासाठी एक दिवसाची सुट्टी देण्यात यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT