China Fire Accident Dainik Gomantak
ग्लोबल

China Fire Accident: चीनमध्ये मोठी दुर्घटना, दुकानांच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू

China Fire Accident: चीनमध्ये आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Manish Jadhav

China Fire Accident: चीनमध्ये आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एपीच्या वृत्तानुसार, चीनच्या आग्नेय जिआंग्शी प्रांतात लागलेल्या आगीत किमान 25 लोकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक सरकारचे म्हणणे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी चीनच्या दक्षिण जिआंग्शी प्रांतात काही दुकानांच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने या घटनेची माहिती दिली. एवढेच नाही तर ज़िन्यू शहरात लागलेल्या आगीत लोक जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र सरकारी निवेदनात किती लोक जखमी झाले हे सांगितले नाही.

चीनमध्ये यापूर्वी आगीच्या घटना घडल्या आहेत

यापूर्वीही, चीनमध्ये आगीच्या वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिली घटना हेनान प्रांतातील यानशानपू गावातील घडली होती, जिथे शुक्रवारी रात्री 11 वाजता यिंगकाई शाळेत आग लागली होती. या अपघातात आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

आग आटोक्यात आणली होती

स्थानिक अग्निशमन विभागाने सांगितले की, या अपघातानंतर बचाव कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. वृत्तसंस्था पीटीआयने चिनी वृत्तसंस्था शिन्हुआच्या हवाल्याने म्हटले आहे की, आगीत भाजल्यामुळे एक जण गंभीररित्या जखमी झाला होता.

प्रोडक्शन वर्कशॉपमध्ये झालेल्या स्फोटामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला

नुकत्याच घडलेल्या दुसर्‍या घटनेत, पूर्व चीनमधील जिआंगसू प्रांतातील चांगझोउ शहरातील प्रोडक्शन वर्कशॉपमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य आठ जण किरकोळ जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT