Viral Video |  Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: 60 सेकंदात चोरट्यांनी गायब केल्या 7 कोटी किमतीच्या 5 आलिशान गाड्या!

Viral Video Luxury Cars: तुम्ही अनेकदा कार चोरीच्या घटनांबद्दल ऐकले, वाचले असेलच, ज्यामध्ये चोर वेगवेगळ्या प्रकारे कारची चोरी करतात.

दैनिक गोमन्तक

Viral Video Luxury Cars: तुम्ही अनेकदा कार चोरीच्या घटनांबद्दल ऐकले, वाचले असेलच, ज्यामध्ये चोर वेगवेगळ्या प्रकारे कारची चोरी करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्हिडिओबद्दल सांगत आहोत, जो पाहून तुम्हालाही वाटेल की, हे नक्कीच एखाद्या चित्रपटातील सीनपेक्षा कमी नाही. कारण चोरट्यांनी अवघ्या 60 सेकंदात 7 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार चोरल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. या चोरट्यांनी इतक्या हुशारीने गाड्या चोरल्या आहेत की, आजतागायत पोलिसांना कोणताच सुगावा लागलेला नाही. तुम्ही स्वतः हा व्हिडिओ पाहा.

पाच आलिशान गाड्या कॅम्पसमध्ये घुसल्या आणि पळवून नेल्या

अवघ्या 60 सेकंदात चोरट्यांनी पाच आलिशान कार पळवल्या. हे प्रकरण इंग्लंडमधील (England) एसेक्स काउंटीचे आहे. जिथे रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी काही सेकंदात कार चोरुन नेल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. या पाच कारची (Car) किंमत 7 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच, इंग्लंडमधील एसेक्स प्रांतातील थुरॉकच्या बरोजवळील बुलफान गावात ब्रेंटवुड रोडवरील कॅम्पसमध्ये चोरांनी प्रवेश केला. त्यांनी पहिल्यांदा कॅम्पसमधून एक एक करुन दोन पोर्श कार आणि एक मर्सिडीज मेबॅक अशा एकूण पाच गाड्या बाहेर काढल्या. यातील एका चोरट्याने गेट उघडे ठेवले तर उर्वरित चोरट्यांनी एकामागून एक आलिशान कार बाहेर नेली.

चोरांना पकडण्यात पोलीस खवळले, जनतेची मदत घेतली

या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी (Police) मोठी कसरत केली आहे. स्थानिक पोलिसांनी आता तेथील लोकांची मदत घेतली आहे. इंग्लंडमधील या चोरीने जनता आणि अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी स्वत: या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला असून लोकांना त्यांच्याकडे जी काही माहिती असेल ती पोलिसांशी शेअर करण्याची विनंती केली आहे. एसेक्स पोलिस कार आणि चोरांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी मर्सिडीज मेबॅक कार जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT