Women Dainik Gomantak
ग्लोबल

'व्हर्जिनिटी' शब्दाला मिळालं नवं नाव, जगात चर्चेला आल उधाण

टोरंटोस्थित (Toronto) प्रसिध्द लेखक निकोल हॉजेस (Nicole Hodges) 'व्हर्जिनिटी' ऐवजी 'सेक्सुअल डेब्यू' (Sexual debut) हा शब्द वापरण्याची मागणी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

'व्हर्जिनिटी' (Virginity) हा शब्द गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. व्हर्जिनिटी टेस्ट (Virginity Test) थांबवण्याची मागणी केल्यानंतर आता काही लोक हा शब्द बदलण्याचीच मागणी करत आहेत. टोरंटोस्थित (Toronto) प्रसिध्द लेखक निकोल हॉजेस (Nicole Hodges) 'व्हर्जिनिटी' ऐवजी 'सेक्सुअल डेब्यू' (Sexual debut) हा शब्द वापरण्याची मागणी करत आहेत. हॉजेसने बीबीसीला सांगितले, 'आम्ही अजूनही 'व्हर्जिनिटी' 'सारखा जुना आणि निरुपयोगी शब्द वापरत आहोत, जो आता काळानुसार बदलण्याची गरज आहे.'

दरम्यान, होजेस यांच्या मते, 'व्हर्जिनिटी' हा शब्द कालबाह्य झाला आहे, फक्त तो बदलण्याची गरज आहे असे नाही तर, 'व्हर्जिनिटी' ही संकल्पना देखील कालबाह्य झाली आहे. या संकल्पनेचे अस्तित्वात काहीच महत्त्व नाही, कारण तुमची सेक्सुअल जर्नी कधीच संपत नसते. त्याऐवजी, 'सेक्सुअल डेब्यू' हा शब्द अधिक संयुक्तित आहे. हॉजेसने हा शब्द त्यांच्या नवीन पुस्तकात अनेक वेळा वापरला आहे. हॉजेसने यासाठी एक मोहीमही देखील सुरु केली आहे.

गेल्या वर्षी एका ट्विटच्या माध्यमातून होजेस यांनी सांगितले होते की, 'व्हर्जिनिटी' हा शब्द पुन्हा रिब्रांड करण्याची वेळ आली असून जेणेकरुन महिलांनी त्यास त्यांची कमतरता म्हणून घेऊ नये. 'व्हर्जिनिटी' मधून असे दिसते की, आपण काहीतरी गमावले आहे. आता आपण 21 व्या शतकात आहोत, मात्र तरीही कौमार्य गमावणे लाजिरवाणे मानले जात आहे. आताच्या काळात ते बदलण्याची गरज आहे. 'व्हर्जिनिटी' ला सेलिब्रेशन प्रमाणे घेतले पाहिजे. तथापि, काही तज्ञ हॉजेस यांच्याशी सहमत नाहीत. ते म्हणतात की, यामुळे सेक्स करण्याची प्रवृत्ती वाढेल.

"जेव्हा तुम्ही 'व्हर्जिनिटी' किंवा 'सेक्सुअल डेब्यू' सारखे शब्द वापरता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या लैंगिकतेबद्दल बोलत असता," कॅलिफोर्नियाचे लैंगिक शिक्षणतज्ज्ञ ज्युलिया फेल्डमन (Julia Feldman) म्हणतात की, लैंगिक समाधानाचा अनुभव घेण्यासाठी जोडीदाराचा समान सहभाग आवश्यक आहे. तथापि, व्हर्जिनिटी या शब्दावर अधिक काम करणे आवश्यक आहे. आपल्याला फक्त एकदा सेक्स केल्यानंतर 'व्हर्जिनिटी' गमावण्याच्या संकल्पनेतून बाहेर पडावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT