स्वित्झर्लंडमध्ये समलिंगी विवाहाला अखेर मिळाली मान्यता

जवळपास दोन तृतीयांश स्विस मतदारांनी समलिंगी विवाह करण्याच्या सरकारच्या योजनेला मान्यता दिली आहे.
Switzerland
SwitzerlandDainik Gomantak
Published on
Updated on

समलिंगी विवाहाबद्दल कायदा करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) सार्वमत घेण्यात आले. ज्यामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देण्यासाठी देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला यात कोणत्याही स्वरुपाची समस्या नसल्याचे समोर आले आहे. स्वित्झर्लंडच्या सरकारी प्रसारकांसाठी gfs.bern पोलिंग एजन्सीने अंदाज जारी केले त्यात, 64 टक्के लोक समलिंगी विवाहाच्या बाजूने होते (Referendum in Switzerland), तर 36 टक्के लोक समलिंगी विवाहाच्या विरोधात होते. जवळपास दोन तृतीयांश स्विस मतदारांनी समलिंगी विवाह करण्याच्या सरकारच्या योजनेला मान्यता दिली आहे.

जनमताचे निकाल आल्यानंतर समलिंगी लोक आणि त्यांच्या समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला. स्वित्झर्लंड संसद आणि प्रशासकीय फेडरल कौन्सिलने 'मॅरेज फॉर ऑल' (Marriage for All) नियमाचे समर्थन केले आहे. भूतकाळात या संदर्भात जनमत घेण्यात आले होते, ज्यात लोकांनी ठोस पाठिंबाही व्यक्त केला होता.

Switzerland
उत्तर कोरिया नंतर 'या' आशियाई देशाने एकही कोरोना रुग्ण नसल्याचा केला दावा

स्वित्झर्लंडने 2007 पासून समलिंगी पार्टनरशिपला परवानगी दिली होती. समलैंगिक विवाहाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचे म्हणणे होते की, समलिंगी जोडप्यांना हेट्रोसेक्सुएल जोडप्यांप्रमाणेच अधिकार असावेत. जसे मूल दत्तक घेणे किंवा नागरिकत्वाशी संबंधित अधिकारसंबंधी.

दरम्यान, मतदानाच्या आधी, सरकार आणि खासदारांनी मतदारांना लग्नासाठी पाठिंबा देण्याचे आणि LGBTQ+ जोडप्यांना मिळणारी असमान वागणूक बंद करण्याचे आवाहन केले. गेल्या वर्षी देशातील विधिज्ञांनी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी मतदान केले. परंतु कायद्याला विरोध करणाऱ्या पुराणमतवादी नेत्यांनी या विषयावर जनमत चाचणी घेण्यासाठी आवश्यक 50,000 स्वाक्षऱ्या गोळा केल्या होत्या. काही ख्रिश्चन गटांच्या सदस्यांनी आणि स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या स्विस पीपल्स पार्टी (Swiss People's Party) ने अशा विवाहांना कडाडून विरोध केला. स्वित्झर्लंडने 1942 मध्ये समलैंगिकतेला अपराधी ठरवण्यात आले होते, परंतु 1990 च्या दशकापर्यंत स्थानिक आणि प्रादेशिक पोलिसांकडे 'समलैंगिक नोंदणी' होती.

Switzerland
आइसलँडमध्ये 'महिला राज', इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 33 खासदार

2007 पासून, समलिंगी जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु त्यांना त्यावेळी लग्नाचा अधिकार देण्यात आला नव्हता. दरवर्षी सुमारे 700 लोक एकत्र राहण्यासाठी नोंदणी करतात. मात्र, अशा प्रकारे राहणाऱ्या लोकांना विवाहित जोडप्यांप्रमाणे समान अधिकार मिळत नाहीत. त्यांना मुले दत्तक घेण्यास नकार देण्यात आला. डिसेंबरमध्ये स्विस खासदारांनी समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर आणि विचित्र लोकांना नागरी संघाऐवजी विवाह करण्याची परवानगी देण्याचे मत दिले.

शिवाय, एकदाचा सार्वमताचा निकाल निश्चित झाला की, त्यामुळे या समलैंगिक विधेयकाच्या कायद्याला आता मान्यता मिळू शकेल. आता समलिंगी जोडप्यांना एकत्र मुले दत्तक घेता येतील आणि ते नागरिकत्वासाठी अर्जही करु शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com