London tops world in terms of romance Dainik Gomantak
ग्लोबल

रोमांन्सच्या बाबतीत लंडन जगात अव्वल!

जगातील कोणत्या शहरातील लोक प्रणयाच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात, हे पहिल्यांदाच समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

जगात अनेक शहरे आहेत आणि त्या सर्वांची स्वतःची खासियत आहे. प्रत्येक देशाची स्वतःची परंपरा असते जी या देशांच्या शहरांमध्ये सहज दिसून येते. कुठेतरी साधी माणसं भेटतील तर कुठे हुशार माणसं. कुठेतरी तुम्हाला चांगले आदरातिथ्य करणारी माणसे मिळतील तर कुठे लोकांना घरी आलेले पाहुणे आवडत नाहीत. त्याचप्रमाणे नुकतेच इंग्लंडच्या 'द बॉटल क्लब'ने जगातील अनेक शहरांचे सर्वेक्षण केले आणि कोणत्या शहरांमध्ये लोक रोमान्सच्या (Most Seductive Cities of the world) बाबतीत कसे रिअॅक्ट करतात याचा शोध घेतला.

या सर्वेक्षणात जगातील कोणत्या शहरातील लोक प्रणयाच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात, हे पहिल्यांदाच समोर आले आहे. या यादीत सर्वात अव्वल स्थानी इंग्लंडची राजधानी लंडनचे नाव आहे. डेली स्टारच्या अहवालानुसार, द बॉटल क्लबने 80 पैकी 72.2 गुण देत लंडनला नंबर एकचे रोमॅंन्टिक शहर म्हणून घोषीत केले.या शहरातील 1 लाखांहून अधिक लोकांनी अश्लील साइट्सवर अकाउंट बनवले आहेत. त्यापैकी 131 एडल्ट ईवेंट्स आहेत, तर शहरातील 10,000 पेक्षा जास्त लोक एडल्ट सब्सक्रिप्शन साइट OnlyFans वरून पैसे कमवत आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेतील लास वेगास शहर 67.6 गुणांसह दोन नंबरवर आहे, तर न्यूयॉर्कला 66.5 गुण मिळाले आहेत.

प्रणयाच्या बाबतीत लंडनला अव्वल स्थान मिळाले

या सर्वेक्षणातील दुसरी श्रेणी म्हणजे प्रणयाच्या बाबतीत विचित्र वृत्ती स्वीकारणारे लोक. यामध्येही लंडन शहर आघाडीवर आहे. या श्रेणीनुसार, लोक येथे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या कल्पना सांगून प्रयाची इच्छा पूर्ण करतात. यामध्येही लंडनला 40 पैकी 39 गुण मिळाले आहेत. यामध्येही दुसरा क्रमांक लास वेगासचा आहे ज्याला 38 क्रमांक मिळाले आहेत. यानंतर जर्मनीची राजधानी बर्लिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 32.5 गुण मिळाले आहेत.

ब्रेकपच्या यादीत देखील लंडन अव्वल

या सर्वेक्षणात केवळ यूके शहरांमध्ये या श्रेणीचे सर्वेक्षण केले गेले आणि असे आढळले की लंडन ब्रेकपमध्ये देखील अव्वल स्थानी आहे. रिपोर्टनुसार, येथील कपल्स एकमेकांना सर्वाधिक फसवतात आणि रिलेशनशिपमध्ये असूनही त्यांचे अफेअर होते. या यादीत ब्रिटनची दुसरी शहरे बर्मिंगहॅम आणि नॉटिंगहॅम आहेत. Illlicit Encounters नावाच्या वेबसाइटनुसार, लंडनमधील 75 लाख लोकसंख्येपैकी 1 लाखाहून अधिक लोकांचे अफेअर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT