China Lockdown in iPhone City
China Lockdown in iPhone City Dainik Gomantak
ग्लोबल

China Lockdown in iPhone City: हिंसाचारानंतर चीनच्या आयफोन सिटीमध्ये लॉकडाऊन लागू

Akshay Nirmale

China Lockdown in iPhone City: चीनच्या झेंगझाऊ शहरात हिंसक आंदोलनानंतर संपुर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून येथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. चीनच्या याच शहरात आयफोनची निर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी अनेकजण रस्त्यावर उतले आहेत. त्यामुळे पोलिस आणि या कारखान्यातील कामगारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. येथे प्रशासनाने लॉकडाऊन लागू केल्यामुळे सुमारे 60 लाख लोक घरात बंद झाले आहेत. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, म्हणून प्रशासनाने ही काळजी घेतली आहे.

या कारखान्यातील कामगारांना वेतन न मिळाल्याने ते संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांचे आंदोलन तीव्र झाले होते. त्यातच ते पोलिसांना जाऊन भिडले. येथील वाढता तणाव पाहून फॉक्सकॉनने चिनच्या आयफोन कारखान्यातील वेतनावरून सुरू झालेल्या हिंसक संघर्षावर माफी मागितली आहे.

या कारखान्यातील हिंसाचारानंतर संपुर्ण शहरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील निवासी देखील आता घराबाहेर पडू शकणार नाहीत. जोपर्यंत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तोपर्यंत प्रशासन बाहेर पडण्याची परवानगी देणार नाही. अगदीच गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, असे आवाहन झेंगझाऊ शहर प्रशासनाने केले आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून हे लॉकडाऊन लागू केले जाणार आहे. ते पुढील 5 दिवस चालू राहील. याचा परिणाम 60 लाख लोकांवर होणार आहे. तथापि, आयफोन कारखान्यातील कामगारांना हे लॉकडाऊन लागू नसेल.

चीनमध्ये पुन्हा कोरोना डोके वरू काढू लागला आहे. त्यामुळे चीनी पॉलीसीनुसार संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे येथील नागरिक सरकारवर नाराजही आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT