linkedin Dainik Gomantak
ग्लोबल

युजर्सचा आमच्यावर भरवसा हाय ना! म्हणत LinkedIn नं डेटा लिकचं केलं खंडन

700 दशलक्ष वापरकर्त्यांच्या डेटा हॅंकिंगच्या (Data Hacking) बातमीचे खंडन करत खासगी सदस्यांचा डेटा हा पूर्णपणे संरक्षित आहे.

दैनिक गोमन्तक

लिंक्डइन (linkedin) या नेटवर्किंग वेबसाइटने नुकतच एक निवेदन जाहीर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, त्यांच्या 700 दशलक्ष वापरकर्त्यांच्या डेटा हॅंकिंगच्या (Data Hacking) बातमीचे खंडन करत खासगी सदस्यांचा डेटा हा पूर्णपणे संरक्षित आहे. तसेच प्राथमिक तपासणीमध्ये हा डेटा लिंक्डइन आणि इतर विविध वेबसाइट वरुन काढण्यात आला असल्याचे आढळले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल 2021 मधील स्क्रॅपिंग अपडेटमध्ये (Scraping Update) नोंदवविण्यात आलेला डेटाचा सुध्दा समावेश आहे, असे मंगळवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युझर्सचा आमच्यावर भरवसा हाय ना!

लिंक्डइन कंपनीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, त्याचे वापरकर्ते त्यांच्या डेटावर भरवसा ठेवतात. तसेच या डेटामध्ये पत्ते, नावे, फोन, ईमेल, राहण्याचे ठिकाण, रेकॉर्ड, लिंक्डइन युजर्स आणि प्रोफाइल यूआरएल, व्यवसायिक अनुभव, वैयक्तिक माहिती किंवा त्याची पार्श्वभूमी, लिंग आणि इरत सोशल मिडियावरील (Social Media) खाती आणि वापरकर्त्याचे नाव याची सर्व माहिती संरक्षित आहे. The Sun च्या एका रिपोर्टनुसार, जगातील सर्वात मोठे डेटा लिक 22 जून रोजी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच सुमारे 300 कोटी लोकांचे पासवर्ड डेटा लीक झाला असून सगळ्यात मोठा सिक्युरिटी लीक झाल्याचे मानले जाते. रीस्टोरप्रायझीच्या अहवालानुसार, हॅकरद्वारा डेटा लिक झाला असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनासह, लिंक्डइनने यासंबंधीचा योग्य तो पाठपुरावा एक पोस्ट शेअर केली आहे. जेथे कंपनीकडून त्यांच्या सॉप्टवेअर आणि विस्तार सूचीबध्द माहिती देण्यात आली आहे. लिंक्डइनकडून सांगण्यात आले की, कोणत्याही थर्ड पार्टी सॉप्टवेअरच्या वापरास परवानगी देता येत नाही. त्याचबरोबर यामध्ये असेही म्हटले की, जे सदस्य हॅकिंगच्या दृष्टीने साधने वापरतात ते इतर वापरकर्त्यांच्या कराराचे उल्लंघन करत आहेत आणि त्यांचे आकाऊंट प्रतिबंधित किंवा बंद ठेवण्याचा धोका आहे.

लिंक्डइने पुढे म्हटले, ''त्यांच्या सदस्यांचा डेटा संरक्षित ठेवण्यासाठी आम्ही लिंक्डइनच्या व्यासपीठाचा गैरवापर करणाऱ्या स्क्रॅपिंग, ऑटोमेशन, आणि इतर साधनांच्या ऑपरेशनच्या विरोधात आमचे तांत्रिक उपाय आणि त्याचबरोबर संरक्षण सुधारण्यासाठी आम्ही सतत कार्यशील आहोत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT