Saifullah Kasuri  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: 'इस्रायलला पाठिंबा दिला तर उद्ध्वस्त करु'! स्वतःच पाळलेला भस्मासूर पाकिस्तानवर उलटला; दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची खुली धमकी

Saifullah Kasuri Threatens Pakistan Government: दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच निर्माण केलेल्या भस्मासुराचा सामना करावा लागत आहे.

Manish Jadhav

Saifullah Kasuri Threatens Pakistan Government: दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच निर्माण केलेल्या भस्मासुराचा सामना करावा लागत आहे. कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पाकिस्तान सरकार आणि तिथल्या लष्कराला जाहीरपणे उघड धमकी दिली. कसूरीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना थेट इशारा दिला असून पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्याने किंवा सत्ताधाऱ्याने इस्रायलला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जीवे मारले जाईल, तसेच त्याचे अस्तित्व पूर्णपणे उद्ध्वस्त आणि बर्बाद केले जाईल, असे म्हटले.

पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या पडद्यामागे इस्रायलसोबतचे संबंध सुधारण्याबाबत काही अंतर्गत चर्चा आणि तर्कवितर्क सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कसूरीचे हे खळबळजनक वक्तव्य समोर आले.

सैफुल्लाह कसूरीच्या या उघड धमकीमुळे पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी आणि जिहादी दहशतवादी संघटनांचा प्रभाव आजही किती खोलवर आणि मजबूत आहे, हे पुन्हा एकदा जगासमोर आले. ज्या दहशतवादी संघटनांना एकेकाळी पाकिस्तानची सत्ता, तिथले लष्कर आणि गुप्तहेर संघटनांनी भारताच्या विरोधात वापरण्यासाठी उभे केले होते, आता त्याच संघटना थेट पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला आव्हान देत आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर हे पाकिस्तानी दहशतवादी स्वतःला तिथल्या सरकार आणि लष्करापेक्षाही श्रेष्ठ समजू लागले आहेत, जे शाहबाज शरीफ सरकारच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि राजकीय व्यवस्थेसाठी अत्यंत चिंतेची बाब मानले जात आहे.

दुसरीकडे, जागतिक स्तरावर विशेषतः आखाती देशांमध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने थेट इराणवर हल्ला चढवला, ज्यामुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचे ढग जमा झाले. सध्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षावर तात्पुरती युद्धबंदी लागू करण्यात आली असली, तरी हा शांततेचा काळ किती दिवस टिकेल याबाबत तज्ज्ञांमध्ये शंका आहे. कारण इराण आणि अमेरिका (America) यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही आणि कराराचे अनेक बिंदू अद्याप अनिर्णित आहेत. या आंतरराष्ट्रीय तणावादरम्यान पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी इस्रायलच्या मुद्द्यावरुन स्वतःच्याच सरकारला वेठीस धरल्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला धक्का? जसप्रीत बुमराहने नाकारली उपकर्णधारपदाची ऑफर; काय आहे नेमके कारण?

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

SCROLL FOR NEXT