LeT leader Abdul Rehman Makki
LeT leader Abdul Rehman Makki Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video:'काश्मीर पाकिस्तानचा राष्ट्रीय मुद्दा', तुरुंगातून जागतिक दहशतवादी मक्कीने ओकली गरळ

गोमन्तक डिजिटल टीम

लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याने गुरुवारी लाहोरमधील कोट लखपत तुरुंगातून एक व्हिडिओ जारी केला आहे. 'काश्मीरचा मुद्दा हा पाकिस्तानचा राष्ट्रीय मुद्दा आहे, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार सोडवला जावा,' असे दहशतवादी मक्कीने म्हटले आहे.

तसेच, त्याने अल-कायदा किंवा इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने नुकतेच मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

काय म्हणाला दहशतवादी मक्की ?

"मी हे स्पष्ट करू इच्छितो की ओसामा बिन लादेन, अयमान अल-जवाहिरी किंवा अब्दुल्ला अज्जम यांसारख्या लोकांचे, विचार आणि कृतींचे मी समर्थन करत नाही. याउलट मी माझ्या शैक्षणिक जीवनात त्यांच्या कृतीचा नेहमीच विरोध केला आहे. अल-कायदा आणि ISIS च्या विचार आणि कृती माझ्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत."

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ने अलीकडेच पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचे उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.

अब्दुल रहमान मक्कीने UNSC मध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्याची अमेरिका आणि भारत सातत्याने मागणी करत होते. पण चीन त्यात अडथळे आणत होता.

अब्दुल रहमानी मक्की हा जमात-उद-दावा, 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, हाफिज सईद याचा तो भाचा आहे.

अब्दुल रहमान मक्कीच्या या वक्तव्यानंतर भारताने अधिकृत व्यक्तव्य जारी केले आहे. भारत दहशतवादविरोधात नेहमीच झीरो टॉलरन्सची भूमिका राबरत राहिल. तसेच, मक्की हा हाफिज सईद हा भाचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दहशतवादविरोधात कडक कारवाई करण्यासाठी दबाब निर्माण करत राहिल. असे प्रतिक्रिया भारताने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT