Global Terrorist Amir Hamza Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Lashkar-e-Taiba Founder Member Attacked: पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानांना पुन्हा एकदा धक्का बसला.

Manish Jadhav

Lashkar-e-Taiba Founder Member Attacked: पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानांना पुन्हा एकदा धक्का बसला. लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा अत्यंत जवळचा सहकारी आमीर हमजा याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. लाहोरमध्ये हमजा आपल्या कारमधून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला असून त्याला लाहोरमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमे आणि सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आला. हल्लेखोरांनी हमजाच्या हालचालींवर लक्ष ठेवून वर्दळीच्या ठिकाणी त्याला लक्ष्य केले. आमीर हमजा हा लष्कर-ए-तैयबाच्या सुरुवातीच्या 17 प्रभावशाली सदस्यांपैकी एक मानला जातो. हाफिज सईदच्या कोअर टीमचा तो महत्त्वाचा भाग असून संघटनेच्या प्रचाराची आणि प्रकाशनांची संपूर्ण जबाबदारी तो सांभाळत असे. भारतामध्ये झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांशी त्याचे नाव जोडले गेले आहे, ज्यामध्ये 2005 च्या 'आयआयएससी' बंगळुरुवरील हल्ल्याचाही समावेश आहे.

त्याच्या याच भारतविरोधी कारवायांमुळे अमेरिकेने 2012 मध्ये त्याला 'ग्लोबल टेररिस्ट' म्हणून घोषित केले. त्याने लष्करसाठी अनेक मासिके आणि पुस्तकांचे संपादन केले असून इतर दहशतवादी गटांशी समन्वय साधण्याचे काम तो करत असे.

पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांपासून भारतविरोधी दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांवर अशा प्रकारे 'टार्गेट किलिंग' होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यापूर्वीही लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदच्या अनेक वरिष्ठ कमांडर्सना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्याच घरात किंवा रस्त्यावर कंठस्नान घातले. हमजावरील या हल्ल्याने पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. मात्र, प्रत्येक वेळी 'अज्ञात हल्लेखोर' कशा प्रकारे चकवा देऊन पसार होतात, यावर आता पाकिस्तानच्या (Pakistan) सुरक्षा यंत्रणांकडे कोणतेही उत्तर उरलेले नाही. या घटनेमुळे लष्कर-ए-तैयबाच्या फळीला मोठा धक्का बसला असून पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT