Air Pollution  Dainik Gomantak
ग्लोबल

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Lancet Study: वाढते वायू प्रदूषण अनेक मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषणामुळे लोकांमध्ये श्वसनाच्या समस्या झपाट्याने वाढू शकतात.

Manish Jadhav

Air Pollution: वाढते वायू प्रदूषण अनेक मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषणामुळे लोकांमध्ये श्वसनाच्या समस्या झपाट्याने वाढू शकतात. मात्र आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदूषणामुळे टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढू शकतो, असे संशोधनात दिसून आले आहे.

दरम्यान, पीएम 2.5 कणांसह (Particulate Matter) प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास टाइप 2 डायबिटीजचा धोका वाढू शकतो. हे कण केसांच्या स्ट्रँडपेक्षा 30 पट पातळ आहेत. जर्नल लॅन्सेटच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संशोधनात असेही म्हटले आहे की, टाइप 2 डायबिटीजची 20% प्रकरणे पीएम 2.5 प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्काशी संबंधित आहेत. हवेतील पीएम 2.5 ची वाढलेली पातळी शरीरातील साखरेची पातळी वाढवत असल्याचे संशोधनात म्हटले आहे. हे सूक्ष्म कण तेल, डिझेल (Diesel), बायोमास आणि गॅसोलीनच्या ज्वलनातून उत्सर्जित होतात.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

संशोधनात असे आढळून आले आहे की, पीएम 2.5 कणांसह प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास टाइप 2 डायबिटीजचा धोका वाढू शकतो. श्वासोच्छवासाद्वारे, केसांच्या स्ट्रँडपेक्षा 30 पट लहान PM2.5 कण रक्तप्रवाहात प्रवेश करतात, ज्यामुळे श्वसन, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. पीएम 2.5 प्रदूषक हा किलर मानला जातो आणि शहरी भागात वायू प्रदूषणाचा एक प्रमुख घटक आहे. जेव्हा आपण PM2.5 च्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. अशा स्थितीत हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.

537 दशलक्ष लोक टाइप-2 डायबिटीजने ग्रस्त

संशोधनात असे दिसून आले आहे की, पीएम 2.5 प्रदूषकांच्या महिन्याभराच्या संपर्कात रक्तातील साखरेची पातळी वाढली. त्याचबरोबर सुमारे एक वर्षापेक्षा जास्त काळ संपर्कात राहिल्यास टाईप 2 डायबिटीजचा धोका 20% वाढतो. सुमारे 537 दशलक्ष लोक टाइप-2 डायबिटीजने ग्रस्त आहेत आणि त्यापैकी निम्म्या लोकांना हे माहीतही नाही की ते डायबिटीजने ग्रस्त आहेत. दरम्यान, WHO च्या म्हणण्यानुसार भारतात 18 वर्षांवरील अंदाजे 77 दशलक्ष लोक डायबिटीज (टाइप 2) ग्रस्त आहेत आणि सुमारे 25 दशलक्ष लोकांना प्रीडायबिटीज आहे (भविष्यात डायबिटीज होण्याचा मोठा धोका).

दिल्लीची हवा खूपच खराब!

रिपोर्टनुसार, बिहारमधील बेगुसराय जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून उदयास आले आहे, तर दिल्लीची (Delhi) ओळख सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेच्या राजधानीचे शहर म्हणून झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: उर्मिला गावकर यांना नविन घराचे आश्वासन; आमदार देविया राणे यांची तत्काळ दखल

Goa Badminton: म्हापसा शटलर्स बॅडमिंटन स्पर्धेत रितिकाला तिहेरी किताब! शाहीन, अवनीला दुहेरी मुकूट

Goa Politics: ‘केव्‍हा देणार तुम्‍ही आश्‍वासन?’ विजय सरदेसाईंचा मराठी प्रश्न आणि साधलेली संधी

IND vs ENG: शुभमन गिल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, 19 वर्षे जुना विक्रम मोडण्याची मोठी संधी; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Highway: 3 महिन्यांत हायवेची संरक्षक भिंत खचली, वाहनधारकांत भीती; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT