kuwait emir sheikh nawaf al ahmad al sabah passed away
kuwait emir sheikh nawaf al ahmad al sabah passed away Dainik Gomantak
ग्लोबल

Kuwait Emir Passed Away: कुवेतचे अमीर शेख नवाफ यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Manish Jadhav

Kuwait Emir Passed Away: कुवेतचे अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह यांचे निधन झाले आहे. वैद्यकीय कारणांमुळे त्यांना नोव्हेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या निधनाची बातमी येण्यापूर्वी कुवेत टीव्हीवर कुराणातील आयतांचं पठण करण्यात आलं. शेख नवाफ यांना त्यांचा सावत्र भाऊ शेख सबाह अल-अहमद अल-सबाह यांनी 2006 मध्ये युवराज म्हणून नियुक्त केले होते. यानंतर, 2020 मध्ये शेख सबाह अल अहमद अल सबाह यांच्या निधनानंतर, त्यांनी अमीर म्हणून शपथ घेतली होती. शेख नवाफ हे त्यांच्या मुत्सद्देगिरीसाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ओळखले जात होते.

इंटीरियर आणि संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले

दरम्यान, देशाचे अमीर बनण्यापूर्वी त्यांनी कुवेतचे इंटीरियर आणि संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले होते. मात्र त्यांचा सक्रिय सहभाग सरकारमध्ये दिसला नाही. अमीर पदासाठी ते एक वादग्रस्त चेहरा असले तरी. शेख नवाफ यांनी आपल्या कार्यकाळात प्रामुख्याने देशांतर्गत मुद्द्यांवर केंद्रित केले होते, कारण देश अनेक राजकीय वादांनी ग्रासलेला होता.

कुवेतमध्ये आता सत्ता कोणाला मिळणार?

कुवेतच्या नेत्यांचे आरोग्य हा देशातील एक संवेदनशील मुद्दा आहे. या देशाने राजपरिवाराचा सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष खूप पाहिला आहे. असे मानले जाते की, कुवेतची सत्ता आता शेख नवाफ यांचा सावत्र भाऊ आणि कुवेतचे उपशासक शेख मेशाल अल अहमद अल जबर (83) यांच्या हातात येऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT