Pakistan bomb blast at Kohat mosque during Friday prayers Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Pakistan Mosque Bomb Attack 16 Dead: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी एका आत्मघाती हल्ल्याने संपूर्ण देश हादरला.

Manish Jadhav

Khyber Pakhtunkhwa Mosque Bomb Attack: पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी (18 सप्टेंबर) एका आत्मघाती हल्ल्याने देश हादरला. कोहाट येथील जुन्या पोलीस लाईन परिसरातील मशिदीजवळ दुपारी नमजाच्या वेळी अचानक हा स्फोट झाला. या भीषण हल्ल्यात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 50 हून अधिक नागरिक आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा भीषण हल्ला करण्यात आला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला, तर स्फोटानंतर लागलीच मशिदीच्या बाहेर जोरदार गोळीबारही झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटकांनी भरलेले एक अज्ञात वाहन भरधाव वेगात आले आणि पोलीस लाईन्सच्या मशिदीच्या मुख्य गेटवर थेट आदळले. वाहनाची धडक होताच मोठा स्फोट झाला, ज्यामुळे मशिदीच्या बाहेरील भिंती कोसळल्या. प्रांतीय पोलीस प्रमुख झुल्फिकार हमीद यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या आत्मघाती स्फोटात मृत्यू झालेल्या 16 जणांमध्ये 5 पोलीस कर्मचारी आणि 11 सामान्य नागरिकांचा समावेश आहे. स्फोटाच्या वेळी मशिदीत मोठा जनसमुदाय नमाजसाठी जमला होता, त्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढले.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयाचे एमएस ताहीर अली शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात 15 हून अधिक मृतदेह आणण्यात आले असून 50 हून अधिक जखमींवर तातडीने उपचार सुरु आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोहाट-हंगू रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून संपूर्ण पोलीस लाईन परिसरात अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अद्याप कोणत्याही दहशतवादी (Terrorist) संघटनेने या भीषण हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, पेशावरपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या संवेदनशील भागात घडलेल्या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले असून संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT