North Korean dictator Kim Jong Un considering increasing the capability of nuclear missiles Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea Fires Missile: उत्तर कोरिया करणार अणुचाचणी; किम जोंग उन यांचा इशारा

आणखी दोन न्युक्लियर क्रुझ क्षेपणास्त्रांची चाचणी; 2000 किलोमीटर रेंज

गोमन्तक डिजिटल टीम

North Korea Fires Missile: उत्तर कोरिया गेल्या काही दिवसांपासून सतत विविध क्षेपणास्त्रांचे परिक्षण करत आहे. आता पुन्हा उत्तर कोरियाने हुकुमशहा किम जोंग उन यांच्या पाहणीखाली आणखी दोन न्युक्लियर क्रुझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. या चाचणीनंतर उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी, आम्ही अणुचाचणीच्या दिशेने जात आहोत, असा गर्भित इशारा दिला आहे.

ही दोन्हे क्षेपणास्त्रे दीर्घ पल्ल्याची असून २००० किलोमीटर इतकी त्यांची रेंज आहे. ही दोन्ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. या क्षेपणास्त्राने बुधवारी अचूक लक्ष्यभेद केल्याचे सांगितले जात आहे. तथापि, त्यांनी कुठले हा लक्ष्यभेद केला, याचा खुलासा केला गेला आहे.

ही दोन्ही क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या लष्करात सामिल झाल्याने त्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे अण्वस्त्र हल्ला करण्यासही आता उत्तर कोरियाचे लष्कर समर्थ असणार आहे. तथापि, त्यामुळे कोरियन उपखंडात तणाव वाढला आहे. दरम्यान, आता उत्तर कोरिया पहिली अणुचाचणी घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीनंतर किम जोंग उन म्हणाले की, ही चाचणी हा आमच्या प्रत्येक शत्रुराष्ट्राला इशारा आहे. आम्ही अणुचाचणीच्या दिशेने जात आहोत. आणीबाणीच्या स्थितीत किंवा युद्ध परिस्थितीत लष्कराची ताकद यामुळे आणखी वाढणार आहे. आम्ही आमच्या सैन्याला युद्धपरिस्थितीसाठी तत्पर ठेऊ इच्छितो.

दोन दिवसांपुर्वीच उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण केले होते. हे क्षेपणास्त्र जपानच्या हवाईहद्दीतून गेले होते. उत्तर कोरियाजवळच समुद्रात अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात युद्ध सराव सुरू आहे. दोन आठवडे चाललेल्या या युद्धसरावावर स्वतः किम जोंग उन लक्ष ठेऊन होते. त्यामुळे उत्तर कोरिया नाराज असून अमेरिकेपासून रक्षण करण्यासाठी क्षेपणास्त्रांचे परिक्षण करत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

SCROLL FOR NEXT