Kim Jong-un
Kim Jong-un Dainik Gomantak
ग्लोबल

किम जोंग यांचा अण्वस्त्र वापराचा इशारा

दैनिक गोमन्तक

आपल्या भडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी पुन्हा एकदा भडक वक्तव्य केलं असून ‘‘आम्हाला कुणी धमकावले,तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’’असे ते म्हणाले आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यावर दबाव टाकण्यासाठी किम यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे. (Kim Jong Un warns of nuclear weapons )

राजधानी प्योंगयांगमध्ये या आठवड्यात मोठ्या लष्करी परेडचे आयोजन केल्याबद्दल किमने आपल्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांचेही कौतुक केले. उत्तर कोरियाच्या सैन्याला अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्याची तीव्र इच्छाही यावेळी व्यक्त केली. आपल्या देशाला असलेले सर्व धोके दूर करण्यासाठी अण्वस्त्रधारी लष्कर उभारणीचा कार्यक्रम सुरूच राहील, असे त्यांनी ठामपणे म्हणाल्याचे वृत्त उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तवाहिनी कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने शनिवारी म्हटले आहे.

आयोजन केलेल्या लष्करी परेडमध्ये उत्तर कोरियाने आपले सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र सहभागी केले होते. या आंतरखंडीय अस्त्राचा पल्ला अमेरिकेपर्यंत आहे. वाहन किंवा पाणबुडय़ांतून डागले जाऊ शकेल असे घन इंधनावरील क्षेपणास्त्रही संचलनात प्रदर्शित करण्यात आले. त्याचा वापर जपान आणि दक्षिण कोरियाविरुद्ध होण्याचा धोका आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर बंदी लादून त्यासाठी आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. त्याला किम यांचा विरोध आहे.

किम जोंग-उन यांच्याबद्दल थोडक्यात

किम जोंग-उन हे उत्तर कोरियाचे राजकारणी आहेत. किम जोंग यांनी 2011 पासून उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आहेत तसेच 2012 पासून कोरियाच्या वर्कर्स पार्टीचे नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत जगाला हादरवून सोडणारी अनेक स्फोटक वक्तव्य केली आहेत. ज्याच्यावर अमेरिकेने अनेकदा आक्षेप घेत भूमिका उत्तर कोरियाने बदलावी असे ही खडसावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT