KFC Outlets Dainik Gomantak
ग्लोबल

KFC Stores Closed: मलेशियाच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत KFC ने बंद केली आउटलेट्स

KFC Outlets: यूएस कंपनी केएफसीने इस्रायल बॉयकॉटमुळे मलेशियातील 100 हून अधिक स्टोअर बंद केले आहेत.

Manish Jadhav

KFC Stores Closed: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मानवी हानीनंतर जगभरात इस्रायलबद्दलचा संताप वाढत आहे. अनेक देशांनी इस्रायलशी संबंध तोडले आहेत, तर मानवाधिकारांबद्दल काळजी करणारे लोकही जगभरात आपापल्या पातळीवर इस्रायलवर बहिष्कार घालत आहेत.

यूएस कंपनी केएफसीने इस्रायल बॉयकॉटमुळे मलेशियातील 100 हून अधिक स्टोअर बंद केली आहेत. स्टोअर बंद करण्याबाबत जारी केलेल्या निवेदनात कंपनीने स्टोअर चालवण्यासाठी खराब आर्थिक स्थितीचे कारण दिले आहे.

चिनी वृत्तपत्र 'नानयांग सियाऊ पाऊ' नुसार, अमेरिकन कंपनीने आपली 108 आउटलेट बंद केली आहेत. गाझा बॉयकॉटमुळे केलांटन राज्य सर्वात जास्त प्रभावित झाले, जिथे सुमारे 80 टक्के KFC स्टोअर्स म्हणजेच 21 आउटलेट बंद करण्यात आली आहेत.

स्टोअर बंद करण्याचे कारण दिले

मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि कंबोडिया येथे केएफसी स्टोअर्स QSR ब्रँड्स नावाच्या कंपनीद्वारे चालवले जातात. ज्याने आपल्या निवेदनात स्टोअर्स बंद होण्याचे कारण स्पष्ट केले. कंपनीने म्हटले की, “आव्हानदायक आर्थिक परिस्थिती आणि स्टोअर चालवण्याच्या वाढत्या खर्चामुळे आम्ही आमचे काही आउटलेट तात्पुरत्या काळासाठी बंद करत आहोत.” याशिवाय, याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या स्टोअरमध्ये शिफ्ट करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

कुठे आणि किती स्टोअर्स बंद करण्यात आली

QSR वेबसाइटनुसार, मलेशियामध्ये 600 हून अधिक KFC आउटलेट आहेत. पहिले आउटलेट क्वालालंपूरमध्ये 1973 मध्ये उघडण्यात आले होते, त्यानंतर कंपनीने देशभरात आपली आउटलेट उघडली. Google Maps वरुन मिळालेल्या माहितीनुसार, जोहोरमधील 15 स्टोअर्स तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत, तसेच, सेलंगोर आणि केदाहमधील 11 स्टोअर्स, तेरेंगानूमधील 10 स्टोअर्स, पहांगमधील 10 स्टोअर्स, पेराकमधील 9 स्टोअर्स, 6 स्टोअर्स बंद करण्यात आली आहेत. याशिवाय, पेर्लिसमधील 2 स्टोअर्स, मलाक्कामधील 2 स्टोअर्स, पेनांगमधील 5 स्टोअर्स, क्वालालंपूरमधील 3 स्टोअर्स, सारवाकमधील 2 स्टोअर्स आणि सबाहमधील 1 स्टोअर्स बंद करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT