Kerala Assembly Dainik Gomantak
ग्लोबल

Kerala New Name: केरळ नव्हे आता 'केरळम', राज्याचे नाव बदलण्यासाठी विधानसभेत ठराव मंजूर

Kerala Assembly: केंद्राने दुरुस्त्या सुचवून पूर्वीचा ठराव परत केल्यानंतर सभागृहाने नवीन ठराव मंजूर केला.

Manish Jadhav

Kerala Assembly: राज्याचे नाव 'केरळ' वरुन 'केरळम' असे करण्यासाठी घटनादुरुस्ती करुन केंद्राला विनंती करणारा ठराव राज्य विधानसभेने एकमताने मंजूर केल्यावर जवळपास एक वर्षानंतर विधानसभेने सोमवारी किरकोळ दुरुस्त्या करुन पुन्हा ठराव मंजूर केला.

केंद्राने दुरुस्त्या सुचवून पूर्वीचा ठराव परत केल्यानंतर सभागृहाने नवीन ठराव मंजूर केला. हा ठराव मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडला होता, ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारला राज्याचे नाव बदलून भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये 'केरळम' करण्याची विनंती केली होती. काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील विरोधी पक्ष UDF (युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) ने कोणत्याही सुधारणा किंवा बदल न सुचवता हा ठराव स्वीकारला होता.

'सर्व भाषांमध्ये केरळम असे नाव करा'

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, ‘राज्यघटनेच्या (Constitution) पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्या राज्याचे नाव केरळ असे लिहिले आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘’ही विधानसभा एकमताने केंद्र सरकारला राज्याचे नाव बदलण्याचे आवाहन करते. आम्ही केंद्राला राज्यघटनेच्या कलम 3 अंतर्गत नावात बदल करण्याची विनंती करतो. केरळचे नाव बदलून 'केरळम' करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. तसेच, राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये त्याचे नाव बदलून 'केरळम' करावे.’’

मुख्यमंत्री पिनाराई यांनी त्यांच्या ठरावात लक्ष वेधले की, मल्याळममध्ये 'केरळम' हे नाव सामान्यतः वापरले जाते. मात्र, अधिकृत नोंदींमध्ये राज्याला 'केरळ' असे संबोधले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हा ठराव मांडण्यात आला.

आययूएमएलचे आमदार एन शमसुद्दीन यांनी ठरावात सुधारणा करुन अधिक स्पष्टता आणण्यासाठी दुरुस्ती सुचवली. मात्र, सभागृहाने ही दुरुस्ती फेटाळली. राज्याचे नाव अधिकृतपणे बदलण्याची मागणी करणारा ठराव गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी एकमताने मंजूर करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT