Hijab Protes Dainik Gomantak
ग्लोबल

Kashmir Hijab Protest: कर्नाटकनंतर काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थिनींनी खोलला मोर्चा, हिजाब वादाच्या धर्तीवर...!

Kashmir Hijab Protest: कर्नाटकातील मुस्लिम मुलींनंतर आता काश्मीरमधील काही मुस्लिम मुलींना हिजाब घालून शाळेत जायचे आहे.

Manish Jadhav

Kashmir Hijab Protest: कर्नाटकातील मुस्लिम मुलींनंतर आता काश्मीरमधील काही मुस्लिम मुलींना हिजाब घालून शाळेत जायचे आहे. कर्नाटकातील पोशाख आणि बुरखा घालण्याशी संबंधित हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने मुस्लिम विद्यार्थिनींचे अपील फेटाळून लावत ड्रेस कोडचे पालन करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर, कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हिजाब हा इस्लाम धर्माचा अत्यावश्यक भाग नसल्याचे म्हटले होते. म्हणूनच हिजाब घालून कॉलेजमध्ये जाणे हा कायदेशीर अधिकार होऊ शकत नाही. एवढेच नाही तर मुस्लिम विद्यार्थिनींनी (Students) हिजाब घातला नाही तर इस्लामला कोणताही धोका होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

एवढेच नाही तर शाळा-महाविद्यालयांमधील ड्रेस कोडची व्यवस्था कायदेशीरदृष्ट्या वैध असून त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

या निर्णयात स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, राज्यघटनेत नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार अमर्यादित नाहीत आणि सरकारला (Government) हवे असल्यास ते योग्य बंधने घालू शकते.

शाळा आणि मदरसा यात काय फरक असेल?

मात्र, या निर्णयाविरोधात कर्नाटकातील आंदोलक विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे दोन सदस्यीय खंडपीठ या निर्णयावर कोणताही स्पष्ट निकाल देऊ शकले नाही, त्यानंतर हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. अद्याप हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

दुसरीकडे, या गोष्टीचाही विचार करायला हवा की, देशभरातील शाळांमध्ये अशाच प्रकारे धार्मिक कट्टरतावादाला चालना दिली जात असेल, तर शाळा, मदरसासारख्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये काय फरक राहील?

कारण मदरशांमध्ये या मुली केवळ हिजाब आणि बुरखा घालूनच शिक्षण घेऊ शकत नाहीत. उलट तिथे त्यांना इस्लाम धर्माचे पालन करण्याचा आणि त्यांच्या भाषेत शिक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार मिळेल.

मात्र, प्रश्न हा तोच आहे की, धार्मिक नियम आणि कायद्यानुसार शिक्षणासाठी देशात मदरसे आधीच अस्तित्वात असताना शाळांमध्येही हीच व्यवस्था लागू करण्याचा आग्रह का धरला जात आहे.

'इराणमधील मुस्लिम विद्यार्थिनी बुरख्याचा त्याग करत आहेत'

इराणमध्ये महिला हिजाबविरोधी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पुरुषांचाही पाठिंबा मिळाला आहे. महिलांवर जबरदस्तीने हिजाब लादण्याच्या विरोधात सुरु केलेल्या या आंदोलनात देशातील खेळाडू, कलाकार आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मात्र, त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली. सुमारे एक वर्ष जुन्या आंदोलनात 500 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, अनेकांना फाशीही देण्यात आली आहे.

त्याचबरोबर, हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे, परंतु या महिलांचे आंदोलन सुरुच आहे. अशा परिस्थितीत ज्या भारतीय विद्यार्थिनी हिजाब घालून शाळा-कॉलेजात जाण्याचा आग्रह धरत आहेत, त्यांनीही इराणच्या महिला चळवळीबद्दल वाचायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT