Karnataka Hijab Row: हिजाबवरील बंदी संपुष्टात येणार, सिद्धरामय्या सरकार लवकरच घेणार निर्णय

Karnataka Hijab Ban: कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिजाबवरील बंदी संपुष्टात आणण्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे.
Karnataka Hijab Row
Karnataka Hijab RowDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Karnataka Hijab Ban: कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिजाबवरील बंदी संपुष्टात आणण्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार राज्यातील हिजाबवरील बंदी हटवणार आहे.

सध्या नवीन सरकार पदभार स्वीकारुन मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण करण्याच्या प्रतीक्षेत आहे. भाजपच्या निर्णयांचा फेरविचार करु, असे काँग्रेस नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आधीच सांगितले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही भाजपचे निर्णय मागे घेण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, 'जर राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार बनले तर ते भाजप (BJP) सरकारने बनवलेले हिजाब बंदीसह सर्व कायदे मागे घेतील.'

काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास हा मुद्दा पुढे येईल आणि पक्षाला याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल, हे यातून पूर्णपणे स्पष्ट झाले.

Karnataka Hijab Row
Karnataka Hijab Row: 'हिजाब बंदी'च्या निकालावरुन पाकिस्तान आक्रमक

बंदी उठवण्यावर काँग्रेस नेते काय म्हणाले?

त्याचवेळी, बुधवारी विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कर्नाटकातील हिजाब बंदीबाबत चिंता व्यक्त केली आहे, यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे.

त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, 'मला हिजाबच्या मुद्द्यावर भाष्य करायचे नाही, कारण हा धोरणाचा विषय आहे.'

मात्र, काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'काँग्रेस हिजाब बंदी, गोहत्या बंदी कायदा मागे घेईल.'

Karnataka Hijab Row
Karnataka Hijab Row: राज्यातील महाविद्यालये पुढील बुधवारपर्यंत राहणार बंद

धर्मांतर विरोधी कायदा मागे घेतला जाईल

सरकार हे कायदे रद्द करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. यामध्ये भाजप सरकारने आणलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचाही समावेश आहे.

त्याचबरोबर, कनकापुरा शहराजवळील कपलबेट्टा येथे येशू ख्रिस्ताचा 114 फूट उंच पुतळा बांधण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. येशू ख्रिस्ताचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa dog breed ban court case
Harmanpreet Kaur Captaincy
Junta House Demolition
Allahabad High Court Hijab Verdict
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com