Kapil Dev Sunil Gavaskar Imran Khan Support Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

Kapil Dev Sunil Gavaskar Imran Khan Support: जागतिक क्रिकेटमधील 14 दिग्गज माजी कर्णधारांनी एकत्र येत इम्रान खान यांच्या मदतीसाठी पाकिस्तान सरकारला एक पत्र लिहिले आहे.

Manish Jadhav

Kapil Dev Sunil Gavaskar Imran Khan support: पाकिस्तानला 1992 मध्ये विश्वविजेता बनवणारे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद आहेत. 2013 पासून ते तुरुंगात असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांची प्रकृती वेगाने खालावत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर जागतिक क्रिकेटमधील 14 दिग्गज माजी कर्णधारांनी एकत्र येत इम्रान खान यांच्या मदतीसाठी पाकिस्तान (Pakistan) सरकारला एक पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि सुनील गावस्कर यांचाही समावेश असल्याने या विषयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सर्व माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला एक अधिकृत ईमेल पाठवला असून, त्यात इम्रान खान यांच्या तुरुंगातील स्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इम्रान खान हे केवळ पाकिस्तानचेच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील एक महान खेळाडू आहेत, याची आठवण या दिग्गजांनी सरकारला करुन दिली आहे.

त्यांनी पत्रात नमूद केले की, इम्रान खान यांनी आपल्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला आणि क्रिकेटच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला तुरुंगात ज्या प्रकारे वागणूक मिळत आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर जो परिणाम होत आहे, तो अत्यंत खेदजनक आहे. सुमारे 1000 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या इम्रान यांच्यासाठी या खेळाडूंनी प्रामुख्याने मानवी हक्कांची मागणी केली आहे.

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह स्टीव्ह वॉ, क्लाइव्ह लॉयड, अ‍ॅलन बॉर्डर आणि नासिर हुसेन यांसारख्या 14 दिग्गजांनी पाकिस्तान सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, इम्रान खान यांना तात्काळ दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्याची मुभा देण्यात यावी.

दुसरी मागणी म्हणजे, त्यांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सन्मानजनक वागणूक मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना व मित्रांना त्यांना भेटू दिले जावे. तिसरी आणि महत्त्वाची मागणी म्हणजे, इम्रान खान यांना कायदेशीर लढाई पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने लढण्याची पूर्ण संधी दिली जावी. क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले हे खेळाडू आता आपल्या जुन्या सहकाऱ्याच्या जीवनासाठी एकत्र आल्याचे पाहून क्रीडाविश्व भारावून गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT