Kabul Airport: 5 rockets fired intercepted by defense system, states report Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकनं काबूल विमानतळावरील हल्ला परतवला, रॉकेटचं प्रत्त्युत्तर डिफेन्स मिसाइलने

अमेरिकेने (USA) काबूल विमानतळाच्या (Kabul Airport) दिशेने करण्यात आलेले पाच रॉकेट हल्ले (Rockets Attack) उधळून लावले आहेत.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेने (USA) काबूल विमानतळाच्या (Kabul Airport) दिशेने करण्यात आलेले पाच रॉकेट हल्ले (Rockets Attack) उधळून लावले आहेत.विमानतळाच्या दिशेने येणारी ही रॉकेट अमेरिकन डिफेन्स मिसाइल सिस्टीमने (Defense Misael System ) आधीच अडवली आणि नष्ट केली आहेत त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. या पाची रॉकेटला अमेरिकरेने अगोदरच इंटरसेप्ट केले. इंटरसेप्ट म्हणजे तुमच्या दिशेने येणारे कोणतेही रॉकेट किंवा क्षेपणास्त्र शोधून प्रतिशोध घेणे.(Kabul Airport: 5 rockets fired intercepted by defense system, states report)

तथापि, हे सर्व रॉकेट हल्ले निष्फळ झाले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या अहवालांच्या आधारे दिलेले हे विधान आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी हे रॉकेट हल्ले करण्यात आले होते.

विशेष म्हणजे रविवारी अमेरिकेने काबूलवर ड्रोनने हल्ला केला होता. यामध्ये आत्मघाती हल्लेखोराला लक्ष्य करण्यात आले होते. ज्यांचे लक्ष्य काबूल विमानतळ होते. अमेरिकेचे म्हणणे आहे की इस्लामिक स्टेटचे दहशतवादी काबूल विमानतळावर पुन्हा हल्ला करू शकतात. त्यांचे लक्ष्य अमेरिकन सैन्य आहे, जे सध्या काबुलमध्ये आहे.

अमेरिकेने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत त्याचा एक नागरिक किंवा सैनिक काबूलमध्ये आहे तोपर्यंत तिथून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेणार नाही. इसिसचा खोरासन गट काबूलवर रॉकेट चालवत असल्याचे अमेरिकेनेही स्पष्ट केले आहे. यापूर्वी या गटाने काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Bicholim Fish Price Hike: मान्सूनपूर्वी मासळीचे दर कडाडले! डिचोलीत ‘सुरमई’चा तोरा; मत्स्यखवय्यांच्या खिशाला कात्री

SCROLL FOR NEXT