Jyoti Malhotra Dainik Gomantak
ग्लोबल

Jyoti Malhotra: ज्योतीचा पाकिस्तानातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल; शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांसोबत फिरली

Jyoti Malhotra Pakistan Spying Case: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल पुन्हा एकदा मोठा खुलासा झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये ज्योती पाकिस्तानच्या प्रसिद्ध न्यू अनारकली मार्केटमध्ये व्हीलॉगिंग करताना दिसत आहे.

Manish Jadhav

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल पुन्हा एकदा मोठा खुलासा झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये ज्योती पाकिस्तानच्या प्रसिद्ध न्यू अनारकली मार्केटमध्ये व्हीलॉगिंग करताना दिसत आहे. पण या व्हिडिओमध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतीसोबत 6 शस्त्रधारी सुरक्षा रक्षक स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच, ती पाकिस्तानवर खूप प्रेम करते असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ज्योतीच्या पाकिस्तान कनेक्शनबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ स्कॉटलंडमधील प्रसिद्ध युट्यूबर कॅलम यांनी शूट केला आहे. त्याने अलिकडेच पाकिस्तानचा दौरा केला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानातील (Pakistan) मार्केटमध्ये बिंधास्तपणे फिरत आहे. तिच्याबरोबर शस्त्रधारी सुरक्षा कर्मचारीही दिसत आहेत. या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवर 'नो फियर' असे लिहिलेले दिसत आहे, ज्यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, ते एकतर विशेष सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी असतील किंवा तिच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले प्रायव्हेट गार्ड असतील.

स्कॉटिश व्लॉगरलाही संशय आला

स्कॉटिश व्लॉगर कॅलमने स्वतः या व्हिडिओमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला की, 'एका सामान्य युट्यूबरसाठी इतकी मोठी सुरक्षा कशासाठी? ज्योती मल्होत्राच्या आजूबाजूला सुरक्षा घेरा आणि शस्त्रधारी गार्ड पाहिल्यानंतर त्यालाही शंका आली की कदाचित हे प्रकरण व्लॉगिंगपेक्षा वेगळे आहे.' ज्योती पाकिस्तानात शस्त्रधारी गार्डच्या घेऱ्यात फिरत होती. तिला तिथल्या सरकारकडून खास सुरक्षा देण्यात आली, ज्यामुळे ज्योती केवळ एक व्लॉगर होती की ती कोणत्यातरी मिशनवर होती हा प्रश्न पडतो.

एनआयएने अटक केली

ज्योतीला नुकतेच भारतीय गुप्तचर संस्थांनी हरियाणामधून अटक केली. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आणि भारताबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजन्सींना देण्याचा आरोप आहे. तिच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत आणि सोशल मीडिया पोस्टबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्हीआयपी सुरक्षेत पाकिस्तानी बाजारपेठांमध्ये ज्योतीचे फिरणे यामधून सर्व काही सांगून जाते. दरम्यान हा व्हिडिओ तपास यंत्रणांसाठी एक मोठा पुरावा बनू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

रोजच्या वापरातील खाण्याच्या तेलामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली धक्कादायक नवी माहिती

Horoscope: तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल,आत्मविश्वासाने पुढे चला; आर्थिक लाभाचे संकेत

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

SCROLL FOR NEXT