Movimento Brasil Livre Dainik Gomantak
ग्लोबल

‘देशात फक्त संकट आणा' निवडणुकीपूर्वी बोल्सोनारोंच्या विरोधात जनतेचा आक्रोश

दैनिक गोमन्तक

ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन नागरिक निदर्शने करत आहेत. राष्ट्रपतींवर महाभियोग चालवावा, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. फ्री ब्राझील मूव्हमेंट किंवा MBL (Movimento Brasil Livre) सारख्या पुराणमतवादी गटांद्वारे निषेध यात्रा आयोजित केली होती. या आगोदर 2016 मध्ये वामपंथी राष्ट्रपती दिलमा रौसेफ (Dilma Rousseff) यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी दबाव आणला होता. रिओ डी जानेरो (Rio de Janeiro), साओ पाउलो आणि बेलो होरिझोंटे यासह अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत.

ब्राझीलमध्ये 2022 मध्ये अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. एमबीएल नावाच्या संस्थेने निषेधादरम्यान 'ना बोलसोनारो न लुला' असा नारा दिला. निदर्शनांमध्ये असे म्हटले गेले की, विद्यमान अध्यक्ष बोलसोनारो आणि माजी डावे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा (Luis Inacio Lula da Silva) यांना जनतेने मतदान करु नये. सामान्य जनतेकडून संस्थांना भरपूर पाठिंबा मिळत आहे. परंतु स्वतःसारख्या इतर संस्थांच्या पाठिंब्याअभावी ते मोठ्या प्रमाणावर निषेध करु शकत नाहीत.

बोल्सोनारो विरोधात घोषणाबाजी करण्यात आली

दरम्यान, रविवारी शेकडो लोक रिओ शहरातील समुद्रकिनाऱ्यावर एकत्रित आले. यावेळी त्यांच्या हातात ब्राझीलचा झेंडा होता तसेच त्यांनी पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. यावेळी त्यांनी सर्वांनी एकजुटीने बोलसोनारो विरोधात घोषणा दिल्या. पांढरे टी-शर्ट घातलेले शेकडो आंदोलक साओ पाउलोमध्ये (Protests Against Jair Bolsonaro) रॅलीसाठी जमले. निदर्शकांमध्ये असलेले 64 वर्षीय सिव्हिल इंजिनीअर इवेट रामाल्हो यावेळी म्हणाले, "आम्ही येथे लुला किंवा बोलसोनारोसाठी नाही यांच्यासाठी आलेलो नाही." परंतु माझ्या मनात शंका आहे की, राष्ट्रपती (बोलसोनारो) यांना पाठिंबा देण्यासाठी किती लोक पुढे येतील, अध्यक्षांनी देशासाठी काहीही केले नाही, ज्यांनी फक्त संकट आणले आहे.

माजी राष्ट्रपती लुला यांना विजय मिळू शकतो

ब्राझीलमधील निवडणुकांना आता एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण असे मानले जाते की, लुला जिंकू शकतात. 2003 ते 2010 पर्यंत ते देशाचे राष्ट्रपती होते. दुसरीकडे, बोलसोनारोबद्दल बोलताना, ते नेहमीच त्यांच्या अहंकारासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले होते की, प्रत्येकाने रायफल खरेदी करावी. देशातील वाढत्या गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी हे सांगितले होते. यानंतर ते म्हणाले की, आम्हाला भविष्यात तीन पर्याय दिसतात - एकतर तो 2022 ची राष्ट्रपती निवडणूक (President Elections) जिंकेन किंवा तो मरेल किंवा ते तुरुंगात जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT