Joe Biden, Kamala Harris, Boris Johnson wished on Diwali festival  Dainik Gomantak
ग्लोबल

Happy Diwali म्हणत जगभरातील नेत्यांच्या देशवासीयांना शुभेच्छा

त्याचबरोबर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात प्रथमच वन वर्ल्ड ट्रेड सेंटर दिवाळी थीमवर आधारित अॅनिमेशनने सजवण्यात आले आहे .

दैनिक गोमन्तक

भारतासह जगभरात दिवाळी (Diwali) मोठ्या उत्सहाने साजरी करण्यात येत आहे. सामान्यांसह जागतिक नेत्यांनीही (World Leaders) दिवाळी साजरी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस(Kamala Harris) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जो बायडन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाईट हाऊसमध्ये हे दोघेही दिवाळी साजरी करताना दिसले. (Joe Biden, Kamala Harris, Boris Johnson wished on Diwali festival)

व्हाईट हाऊसमध्ये दीप प्रज्वलन करतानाच 'दिवाळीचे दिवे आपल्याला आठवण करून देतात की अंधारातून बाहेर आलं की ते शहाणपण आणि सत्य आहे. विभाजनातून एकता, निराशेतून आशा. अमेरिका आणि जगभरात साजऱ्या होणाऱ्या हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना आमच्या तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.' असा संदेश त्यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी देखील शुभेच्छा देत , 'अमेरिकेत आणि जगभरात दिव्यांचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वर्षीची दिवाळी विनाशकारी महामारीच्या काळात आणखी खोल अर्थ घेऊन येत आहे. ही दिवाळी आपल्याला आपल्या देशातील सर्वात पवित्र मूल्यांची आठवण करून देते.' असे म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा देत 'आमच्या सर्व कठीण प्रसंगानंतर, मला आशा आहे की ही दिवाळी आमच्यासाठी आनंद घेऊन येईल . वर्षाचा हा काळ कुटुंब आणि मित्रांना भेटण्यासाठी असतो. जेव्हा आपण गेल्या नोव्हेंबरचा विचार करतो तेव्हा आपण खूप पुढे आलो आहोत यात शंका नाही.'

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी माझे मित्र नरेंद्र मोदी आणि भारतात आणि जगभरात राहणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत

त्याचबरोबर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात प्रथमच वन वर्ल्ड ट्रेड सेंटर दिवाळी थीमवर आधारित अॅनिमेशनने सजवण्यात आली आहे . यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली, आणि जी हडसन नदीच्या दोन्ही बाजूंनी रोषणाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT