JD Vance Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Statement Controversy: "पाकिस्तान आम्हाला प्रिय'', अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सिनेटर्सचा हल्लाबोल, म्हणाले, 'आधी तुमचे खरे मित्र ओळखा!'

JD Vance Love Pakistan Statement Controversy: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी स्वित्झर्लंडमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली.

Manish Jadhav

JD Vance Love Pakistan Statement Controversy: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी स्वित्झर्लंडमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली. "आम्हाला पाकिस्तान प्रिय आहे" या त्यांच्या विधानावर अमेरिकेच्याच दोन रिपब्लिकन सिनेटर्सनी आक्षेप घेतला असून, पाकिस्तान आणि कतारचा दहशतवादाला आश्रय देण्याचा इतिहास विसरता येणार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

फ्लोरिडाचे सिनेटर रिक स्कॉट यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, आतापर्यंत सर्वांना हे स्पष्ट व्हायला हवे की अमेरिकेचे खरे मित्र कोण आहेत. कतार आणि पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा मोठा इतिहास राहिला आहे. हे दोन्ही देश मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याऐवजी इराणच्या अनेक दशके जुन्या दहशतवादी मोहिमेला पाठिंबा देण्यात अधिक स्वारस्य दाखवत आहेत.

जे.डी. व्हान्स हे पाकिस्तान (Pakistan) आणि कतारच्या नेत्यांसोबत इराणच्या शांतता करारावर चर्चा करत असताना त्यांनी हे विधान केले होते. यावर स्कॉट यांनी पुढे स्पष्ट केले की, इराणने कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्रे बनवण्याची क्षमता मिळवता कामा नये, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. दुसरीकडे, मोंटानाचे सिनेटर टिम शीही यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत थेट ओसामा बिन लादेनचा उल्लेख करत पाकिस्तानची पोलखोल केली.

शीही म्हणाले की, याच पाकिस्तानने एक दशकभर जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेनला लपवून ठेवले आणि त्यांच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेविरुद्धच्या कारवायांना आणि इराणच्या आयातुल्लाला निधी पुरवला. पाकिस्तान आणि कतार कधीही निष्पक्ष मध्यस्थ असू शकत नाहीत, कारण कतार अनेक दशकांपासून दहशतवादी संघटनांसाठी मनी लॉन्ड्रिंग करत आहे.

सिनेटर शीही यांनी सुचवले की, जर या चर्चेत पाकिस्तान आणि कतार सामील आहेत, तर अमेरिकेने संयुक्त अरब अमिराती (UAE), इस्रायल आणि सौदी अरेबियालाही यात समाविष्ट केले पाहिजे, कारण हे देश मध्यपूर्वेत अमेरिकेचे सर्वात विश्वासू आणि आघाडीचे मित्र राहिले आहेत. दरम्यान, जे.डी. व्हान्स यांनी रविवारी हलक्या-फुलक्या अंदाजात म्हटले होते की, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर हे त्यांच्या अत्यंत आवडत्या व्यक्तींपैकी एक आहेत.

ते पुढे म्हणाले होते की, त्यांच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या व्यक्ती आहेत; त्यापैकी एक भारतीय आणि दुसरी पाकिस्तानी आहे. भारतीय व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी, तर दुसरी पाकिस्तानी व्यक्ती फील्ड मार्शल मुनीर आहेत. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी मुनीर यांच्याशी इतर कोणापेक्षाही जास्त संवाद साधल्याचेही व्हान्स यांनी मान्य केले, ज्यावरुन आता अमेरिकेतच वाद पेटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT