किशिदा (Fumio Kishida) यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची निवडणूक जिंकली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा निवडणूक जिंकल्यास देशाचे पुढील पंतप्रधान (Prime Minister)  होऊ शकतात.
किशिदा (Fumio Kishida) यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची निवडणूक जिंकली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा निवडणूक जिंकल्यास देशाचे पुढील पंतप्रधान (Prime Minister) होऊ शकतात. Dainik Gomantak
ग्लोबल

जपानचे मुत्सद्दी राजकारणी फुमियो किशिदा होणार देशाचे पुढील पंतप्रधान

दैनिक गोमन्तक

जपानचे (Japan) मुत्सद्दी असलेले फुमियो किशिदा (Fumio Kishida) देशाचे पुढील पंतप्रधान (Prime Minister) होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची निवडणूक जिंकली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किशिदा निवडणूक जिंकल्यास देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात.

किशिदा जपानचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (LDP) प्रमुख योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा एका वर्षानंतर पायउतार होणार आहे. एक वर्षापूर्वी, तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पायउतार होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सुगा हे पंतप्रधानपदी विराजमान झाले.

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला किशिदाच्या यांच्या रूपात नवीन नेता मिळाला आहे. सोमवारी संसद पंतप्रधानांच्या नावाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, त्यावेळी किशिदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. किशिदा यांचा पक्ष संसदेत आघाडीचा पक्ष म्हणून सरकारचा भाग आहे.

किशिदा यांनी देशाचे लसीकरण मंत्री असलेल्या तारो कोनो यांचा पराभव केला आहे. कानो व्यतिरिक्त, शर्यतीत साने ताकीची आणि सेको नोडा या दोन महिला उमेदवारही होत्या. पण दोघीही पहिल्या फेरीनंतर बाहेर पडल्या. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता ते पुढील महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.

किशिदा हे 2012 ते 2017 पर्यंत होते परराष्ट्र मंत्री

किशिदा 2012 ते 2017 पर्यंत जपानचे परराष्ट्र मंत्री होते. ते जपानच्या प्रतिनिधी सभागृहाचे सदस्य देखील आहेत. एलडीपीच्या धोरण संशोधन परिषदेचे ते अध्यक्षही राहिले आहेत. किशिदा यांना राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1957 रोजी मिनामी कु हिरोशिमा येथील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही राजकारणी होते. याशिवाय जपानचे माजी पंतप्रधान किशी मियाजावा हे त्यांचे नातेवाईक आहेत. किशिदा यांचे वडील न्यूयॉर्क, यूएसएमध्ये काम करत होते. यामुळेच त्यांचे सुरुवातीचे शिक्षण न्यूयॉर्कमध्ये झाले आहे. 1982 मध्ये त्यांना वासेदा विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळाली.

1993 मध्ये किशिदा यांनी जिंकली खासदारकीची निवडणूक

किशिदा यांनी क्रेडिट बँक ऑफ जपानमध्ये बराच काळ काम केले. यानंतर त्यांची सभागृहात प्रतिनिधी सचिव म्हणून नियुक्ती झाली. 1993 साली ते हिरोशिमातून खासदार म्हणून निवडून आले. 2007 ते 2008 पर्यंत त्यांनी ओकिनावा व्यवहार मंत्री म्हणून अबे कॅबिनेटमध्ये काम पाहिले. नंतर त्यांना फकुडाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जोशुआ फाकुडा यांनी त्यांना ग्राहक व्यवहार आणि अन्न सुरक्षा राज्यमंत्री बनवले.

पत्नीच्या फोटोनंतर वादात

अलीकडेच, 63 वर्षीय किशिदा वादात सापडले जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीचा एप्रन घातलेला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्या डेनिम ब्लू कलर एप्रनमध्ये त्यांची पत्नी किशिदा यांना डिनर देत होती. किशिदा यांच्या पत्नीचा फोटो व्हायरल झाल्याने लोक असे म्हणू लागले की ते त्यांच्या पत्नीला मोलकरणीसारखी वागणूक देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT