Japan Population Dainik Gomantak
ग्लोबल

Japan Population:...तर जपानचे अस्तित्व संपुष्टात येईल, घटत्या जन्मदराने देशात घबराट!

Japan: अशा प्रकारे जपानचे अस्तित्व संपुष्टात येईल... जपानच्या पंतप्रधानांचे सल्लागार फुमियो किशिदा यांनी ही चिंता व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

Japan Population: अशा प्रकारे जपानचे अस्तित्व संपुष्टात येईल... जपानच्या पंतप्रधानांचे सल्लागार फुमियो किशिदा यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशातील जन्मदर झपाट्याने घसरल्याने हे संकट उद्भवू शकते.

ते पुढे म्हणाले की, आगामी काळात देशाची सामाजिक सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसमोर गंभीर धोके निर्माण होऊ शकतात.

किशिदांचे सल्लागार मसाका मोरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हे असेच सुरु राहिले तर एक दिवस देश नाहीसा होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात जन्मदर खूपच कमी असल्याचे त्यांनी 28 फेब्रुवारीला सांगितले होते. जपानमध्ये (Japan) जन्मदरात सातत्याने घट होत आहे.

मसाका मोरी म्हणाले की, ज्या प्रकारे लोकसंख्या कमी होत आहे ती चिंतेची बाब आहे. त्यासाठी लोकांनीच जागरुक राहावे. ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी देशात जन्मलेल्यांच्या दुप्पट लोकांचा मृत्यू झाला होता.

गेल्या वर्षी जपानमध्ये 8 लाख मुलांचा जन्म झाला, तर 15 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला. ते पुढे असेही म्हणाले की, आम्हाला मुले आणि कुटुंबाशी संबंधित खर्च दुप्पट करावा लागेल. ही घट आमच्या अंदाजापेक्षा जास्त असल्याचेही ते म्हणाले.

जपानची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे, का तणाव आहे

सध्या जपानची लोकसंख्या 124.6 दशलक्ष आहे. आणि 2008 मध्ये, जपानची एकूण लोकसंख्या 124 दशलक्ष होती.

एवढेच नाही तर या लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्याही खूप जास्त आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा (Employees) तुटवडाही वाढत असून अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मकही आहे.

सध्या, जपानमध्ये 29 टक्के लोक आहेत, ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. दक्षिण कोरियाचा जन्मदर सर्वात कमी आहे, परंतु जपानची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात कपात केली जाईल

मसाका मोरी म्हणाले की, जन्मदरातील ही घसरण हळूहळू येत नसून नाटकीय पद्धतीने झपाट्याने कमी होत आहे. एलजीबीटी आणि जन्मदराशी संबंधित मुद्द्यांवर ते पंतप्रधान किशिदा यांना सल्ला देतात.

आज जर आपण प्रयत्न केले नाहीत तर सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण होऊन संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडेल, असे ते म्हणाले. आपली औद्योगिक आणि आर्थिक ताकदही कमी होईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT