japan big treasure found in excavation even scientists were surprised to see 1 lakh ancient coins Dainik Gomantak
ग्लोबल

Japan News: उत्खननात सापडला मोठा खजिना, 1 लाख प्राचीन नाणी पाहून शास्त्रज्ञही थक्क!

Japan News: आपल्या पृथ्वीवर असे अनेक खजिने आहेत, जे उत्खननादरम्यान सापडतात. कधी जमिनीवर खजिना सापडतो तर कधी समुद्रात.

Manish Jadhav

Japan News: आपल्या पृथ्वीवर असे अनेक खजिने आहेत, जे उत्खननादरम्यान सापडतात. कधी जमिनीवर खजिना सापडतो तर कधी समुद्रात. जेव्हा खजिना सापडतो तेव्हा आश्चर्यचकित होते. असाच एक खजिना जपानमधील एका बांधकामाच्या ठिकाणी शास्त्रज्ञांना सापडला आहे. इथून शास्त्रज्ञांना एक-दोन नव्हे तर 1 लाख प्राचीन नाण्यांचा खजिना सापडला आहे. जपानची राजधानी टोकियोपासून 60 मैलांवर असलेल्या माएबाशी शहरात हा शोध लागला आहे.

दोन हजार वर्षांपूर्वीचे नाणे सापडले

दरम्यान, साइटवर कारखान्याच्या बांधकामासाठी उत्खननादरम्यान शास्त्रज्ञांना (Scientists) हा खजिना सापडला. प्राचीन नाण्यांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत केवळ 334 नाण्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील सर्वात जुने नाणे चीनचे आहे. हे नाणे इ.स.पूर्व 175 मधील असल्याचे सांगितले जाते. सर्वात अलीकडील नाणे 1265 मधील आहे.

बंडलमध्ये नाणी सापडली, प्रत्येक बंडलमध्ये 100 नाणी होती

दुसरीकडे, 1,060 बंडलमध्ये नाणी सापडली आहेत. प्रत्येक बंडलमध्ये अंदाजे 100 नाणी होती. त्यात चीनी शिलालेख असलेली बनलियांग नाणी देखील समाविष्ट होती, जी साधारणपणे 2200 वर्षांपूर्वी चीनमध्ये (China) तयार केली गेली होती. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक एथन सेगल यांनी सांगितले की, अशी नाणी एकेकाळी संपूर्ण जपानमध्ये, विशेषत: मध्ययुगीन काळात (13व्या ते 16व्या शतकात) सापडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT