Most Powerful Passport  Dainik Gomantak
ग्लोबल

Most Powerful Passport 2022: जपान अन् सिंगापूरचा पासपोर्ट पुन्हा अव्वल

निर्देशांकात भारताच्या (India) क्रमवारीत 7 स्थानांची सुधारणा झाली आहे. 2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 90 व्या क्रमांकावर होता. यावेळी तो 83 व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमन्तक

पासपोर्ट रँकिंग जारी करणाऱ्या संस्थेने 2022 (Most Powerful Passport) साठी हेन्ली पासपोर्ट निर्देशांक जारी केला आहे. या रॅंकिंगमध्ये जपान आणि सिंगापूरचा (Singapore) पासपोर्ट पुन्हा एकदा टॉपर आहेत. या देशांचे नागरिक व्हिसाशिवाय 192 देशांमध्ये जाऊ शकतात.

दरम्यान, या निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत 7 स्थानांची सुधारणा झाली आहे. 2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 90 व्या क्रमांकावर होता. यावेळी तो 83 व्या स्थानावर आहे. भारतीय नागरिक 60 देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करु शकतात. त्याच वेळी, पाकिस्तानच्या (Pakistan) पासपोर्टची क्रमवारी उत्तर कोरिया (North Korea), सोमालिया आणि युद्धग्रस्त येमेनपेक्षा वाईट आहे.

तसेच, या क्रमवारीत उत्तर कोरियाचा पासपोर्ट 104 व्या, सोमालियाचा 106 वा आणि येमेन चा 107 वा आहे. तर, पाकिस्तानी पासपोर्टचे रँकिंग 108 वे आहे. पाकिस्तानी नागरिक केवळ 31 देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करु शकतात. पाकिस्ताननंतर सीरिया 109, इराक 110 आणि अफगाणिस्तान (Afghanistan) 111 व्या क्रमांकावर आहे.

प्रथम जाणून घ्या: रँकिंग कसे निर्धारित केले जाते

ही क्रमवारी प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केली जाते. हेन्ली पासपोर्ट व्हिसा इंडेक्सच्या वेबसाइटनुसार रिअलटाइम डेटा वर्षभर अपडेट केला जातो. व्हिसा धोरणातील बदलही विचारात घेतले जातात. इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडून डेटा घेण्यात आला आहे. एखाद्या देशाचा पासपोर्टधारक पूर्वीचा व्हिसा न घेता इतर किती देशांमध्ये प्रवास करु शकतो, या आधारावर क्रमवारी ठरवली जाते. यासाठी त्याला आगाऊ व्हिसा घेण्याची गरज भासणार नाही.

भारतीय नागरिक 60 देशांमध्ये पूर्व व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. गेल्या वर्षी ही संख्या 58 होती. यावर्षी ओमान आणि आर्मेनियाने भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT