Jagmeet Singh Dainik Gomantak
ग्लोबल

कॅनडाच्या निवडणूकीत भारतीय नेता ठरला 'किंगमेकर'

यामध्ये 17 भारतीय निवडूण आले असून त्यामध्ये 16 जण मूळचे पंजाबचे (Punjab) आहेत. त्याचबरोबर यात 6 भारतीय महिलांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

कॅनडात (Canada) हाऊस ऑफ कॉमन्सच्या (House of Commons) निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. यामध्ये 17 भारतीय निवडूण आले असून त्यामध्ये 16 जण मूळचे पंजाबचे आहेत. त्याचबरोबर यात 6 भारतीय महिलांचा समावेश आहे. तसेच न्यू डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते जगमित सिंग (Jagmeet Singh) आणि देशाचे संरक्षणमंत्री हरजित सिंग सज्जन (Defense Minister Harjit Singh Sajjan) यांचा समावेश आहे. मूळच्या भारतीय महिला असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडूण आल्या आहेत, त्यामध्ये अनिता आनंद (Anita Anand), अंजू धिल्लां, सोनिया सिध्दू, रुबी सहोता, बर्दिश चग्गर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अंजू धिल्ला (Anju Dhilla) सलग दोनवेळा निवडूण आल्या आहेत. त्यासह निवडूण आलेले एकमेव बिगरपंजाबी नेते चंद्रकांत आर्य (Chandrakant Arya) हे मूळचे कर्नाटकमधील असून ते लिबरल पक्षाकडून निवडूण आले आहेत. मागच्या वेळी कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉम्न्समध्ये 20 भारतीय जिंकून आले होते. यावर्षी ही संख्या तीनने कमी झाली आहे.

किंगमेकर भारतीय नेते

यंदा कोणत्याच पार्टीला स्पष्ट असे बहुमत मिळालेले नाही. मात्र लिबरल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, जस्टीन ट्रुडो यांच्या गळ्यात पुन्हा पंतप्रधान पदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे जगमित सिंग यांच्या न्यू डेमॉक्रेटिक पक्षांना पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे ते खरे किंगमेकर म्हणून ओळखले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT