Jacinda Ardern Dainik Gomantak
ग्लोबल

''धाकड PM'', पंतप्रधान झाल्यानंतर 8 महिन्यांनी बनल्या जॅसिंडा आर्डर्न 'आई'

चीनने (China) सोलोमन बेटांसोबत सुरक्षा करार केला आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि चीन या जगातील दोन बलाढ्य देशांच्या निर्णयांसमोर इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था बोलण्यापूर्वी किंवा कारवाई करण्यापूर्वी घाबरतात. परंतु या दोन देशांच्या कठोर निर्णयांविरोधात उभ्या राहिलेल्या न्यूझीलंडच्या (New Zealand) पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) उघडपणे त्यांचा विरोध करताना दिसत आहेत.

अलीकडेच, चीनने (China) सोलोमन बेटांसोबत सुरक्षा करार केला आहे. याबाबत न्यूझीलंडने चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारे, चीनची लष्करी ताकद संपूर्ण प्रशांत महासागरात वाढेल. याआधी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी रशिया-युक्रेन युद्धाला विरोध केला आहे. आर्डर्न यांनी न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमधील पत्रकार परिषदेत सांगितले की, 'रशियन सैनिकांनी युक्रेनियन नागरिकांची हत्या केली. रशियाने (Russia) काय केले याचे उत्तर जगाला द्यावे लागणार आहे.' जाणून घ्या न्यूझीलंडच्या या शक्तिशाली महिला नेत्याची कहाणी...

कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांचे स्वतःचे लग्न रद्द करण्यात आले

जानेवारी 2022 मध्ये, न्यूझीलंडच्या 41 वर्षीय PM Jacinda Ardern या वर्षी मंगेतर क्लार्क गेफोर्डशी लग्न करणार होत्या. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. देशातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान जॅसिंडा यांनी कडक निर्बंध लादले होते. या निर्बंधांची घोषणा करण्याबरोबरच, जसिंडा यांनी हे देखील जाहीर केले की, 'कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपण सध्या लग्न करणार नाही.' त्यांच्या या निर्णयाचे जगभरातून कौतुक झाले. इतकंच नाही तर न्यूझीलंडने कोरोना प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलले.

पंतप्रधान झाल्यानंतर 8 महिन्यांनी जसिंडा बनल्या आई

2017 मध्ये, जसिंडा यांनी पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकून न्यूझीलंडमध्ये सरकार स्थापन केले. प्रचार करत असताना त्या गर्भवती होत्या. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर केवळ 8 महिन्यांतच त्या आई झाल्या. आपल्या कार्यकाळात आई झालेल्या त्या जगातील दुसऱ्या पंतप्रधान आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो यांनी पंतप्रधान असताना मुलाला जन्म दिला होता. आर्डर्न आई झाल्यानंतर त्यांचा जोडीदार क्लार्कने काही काळ जबाबदारी सांभाळली. जॅसिंडा यांचा मंगेतर क्लार्क गेफोर्ड एक टीव्ही प्रजेंटर आहे. 2012 मध्ये दोघांची भेट झाली होती. आर्डर्न आणि क्लार्क यांची 2019 मध्ये एंगेजमेंट झाली होती. दोघेही यावर्षी लग्न करणार होते, परंतु कोरोना संकटामुळे ते पुढे ढकलण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT