Italy Pakistani Girl Sanam Abbas Honour Killing Case Dainik Gomantak
ग्लोबल

Honour Killing Case: पाकिस्तानी जोडप्याने इटलीत आपल्याच मुलीची का केली हत्या? कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Honour Killing Case: इटलीतील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी एका पाकिस्तानी जोडप्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Manish Jadhav

Italy Pakistani Girl Sanam Abbas Honour Killing Case: इटलीतील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी एका पाकिस्तानी जोडप्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपल्या 18 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यार होता. मुलीने लग्नास नकार दिल्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी जोडप्याच्या मुलीचे नाव सनम अब्बास असून तिचे वय 18 वर्षे होते. सनमची आई सध्या पाकिस्तानात लपली आहे तर तिचे वडील इटलीच्या तुरुंगात आहेत.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सनम अब्बासचे कुटुंब 2016 मध्ये इटलीतील नोवेलरा येथे राहण्यासाठी आले होते. समनने इथेच शिक्षण घेतले. एप्रिल 2021 मध्ये ती अचानक गायब झाली. सनम बेपत्ता झाल्याची पहिली बातमी तिच्या प्रियकराने पोलिसांना दिली होती. यानंतर स्थानिक पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यावेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. या फुटेजमध्ये सनम आणि तिचे कुटुंबीय दिसत होते. याशिवाय त्यांच्यासोबत आणखी तीन जण होते, त्यापैकी एकाच्या हातात फावडे होते.

प्रियकराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरु केला

सनमच्या वडिलांना तिचे लग्न 2020 मध्ये त्यांच्या एका नातेवाईकाशी करायचे होते, असे तपासात समोर आले. पण सनमला लग्न करायचे नव्हते. यानंतर ती घरातून पळून गेल्यानंतर एका शेल्टर होममध्ये राहू लागली. मात्र तिच्याबद्दल वडिलांना समजताच त्यांनी तिला समजावून पुन्हा घरी आणले. यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांमुळे संशयाची सुई तिच्याच कुटुंबीयांकडे गेली.

खूनाचा उलघडा असा झाला

दुसरीकडे, पोलिसांनी सनमचे वडील आणि काकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रकरणातील सत्य समोर आले. नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर तिचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी सनमचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यानंतर सनमची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे रिपोर्टमधून उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सनमचे वडील आणि काकांना अटक केली. हत्येच्या आरोपावरुन स्थानिक न्यायालयाने शबर आणि नाझियाला जन्मठेपेची आणि तिच्या काकाला 14 वर्षांची शिक्षा सुनावली. तर सनमची आई नाझिया शिक्षा टाळण्यासाठी पाकिस्तानात राहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT