Italy Boat Accident
Italy Boat Accident  Reuters
ग्लोबल

Italy Boat Accident: इटलीजवळ समुद्रात बोट बुडाली; 24 पाकिस्तानी लोकांसह 33 जणांचा मृत्यू

Pramod Yadav

इटलीजवळ समुद्रात बोट बुडाली असून, इटालियन कोस्ट गार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 30 हून अधिक स्थलांतरितांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. याला दुजोरा देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीजवळ हा अपघात झाला असून आतापर्यंत 58 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

राज्य टीव्हीने स्थानिक प्रशासन प्रमुखांच्या कार्यालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळपर्यंत 33 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 58 जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, मृतांमध्ये 24 पाकिस्तानी लोकांचा देखील समावोश असल्याची माहिती समोर आली आहे.

इटलीची वृत्तसंस्था एजीआयने सांगितले की, मृतदेहांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 100 हून अधिक लोक एका लाकडी बोटीवर होते, जी इटलीच्या कॅलाब्रिया द्वीपकल्पावरील क्रोटोन या किनारी शहराजवळ पहाटे पहाटेच्या सुमारास उलटली, असे राज्य रेडिओ आरआयएने बंदर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले. रेडिओच्या वृत्तानुसार बचावकार्य अजूनही सुरू आहे.

नावेत 180 लोक असावेत असे इटालियन न्यूज एजन्सी लाप्रेसेने सांगितले आहे. 27 जण स्वतः पोहून किनाऱ्यावर पोहोचल्याचे सरकारी टीव्हीवर सांगण्यात आले. मात्र, स्थलांतरितांचे राष्ट्रीयत्व अद्याप निश्चित झालेले नाही. बोट कुठून येत होती हे देखील स्पष्ट नव्हते, परंतु स्थलांतरित नौका अनेकदा तुर्की किंवा इजिप्तच्या किनारपट्टी वरून निघतात. अशी माहिती समोर आली आहे.

बचाव कार्यात सहभागी अग्निशमन दलाचे प्रवक्ते लुका कारी यांनी सांगितले की, सुमारे 40 प्रवासी जिवंत सापडले आहेत. रेडिओच्या वृत्तानुसार बचावकार्य अजूनही सुरू आहे. किनार्‍याजवळ नावेचे तुकडे विखुरलेले आहेत. इटालियन न्यूज एजन्सी एजीआयने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बाळाचाही समावेश आहे, ज्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या मिसिंग मायग्रंट्स प्रोजेक्टनुसार, 2014 पासून मध्य भूमध्य समुद्रात 20,333 लोक मरण पावले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT