Italy PM Giorgia Meloni And Minister Bignami  
ग्लोबल

Italy PM Giorgia Meloni: नाझी समर्थकाला मंत्री केल्याने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी वादात

नाझी विचारसरणीविरोधी संघटनांसह विविध पक्षांककडूनही निषेध

गोमन्तक डिजिटल टीम

Italy PM Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या पदभार स्विकारल्यानंतरच्या दोन आठवड्यातच वादात अडकल्या आहेत. आणि याचे कारण आहे, त्यांनी घेतलेले निर्णय. नाझी चिन्ह असलेल्या स्वस्तिकचे आर्मब्रँड परिधान करणाऱ्या गॅलीझो बिगनामी (Galeazzo Bignami) यांना मेलोनी यांनी मंत्रीपद दिले आहे.

गॅलीझो बिगनामी यांचा एक फोटो 2016 मध्ये एक फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी त्यांनी हातावर हिटलरच्या नाझी विचारसरणीचे प्रतिक असलेले स्वस्तिक चिन्हाचा बॅज लावला होता. हा फोटो 2005 मधील आहे. मेलोनी यांचा पक्ष देखील फॅसिस्ट विचारसरणी जोपासणारा पक्ष आहे.

तथापि, बिगनामी यांनी त्या फोटोबद्दल माफी मागितली असून नाझीवाद हा राक्षसी असल्याचे म्हटले होते. उजव्या विचारसरणीच्या नेत्या असलेल्या जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाने नवे सरकार स्थापन केले आहे.

इटलीतील नाझीविरोधी संघटनांनी त्यांच्या मंत्रीपदी नियुक्तीचा निषेध केला आहे. शिवाय येथील इतर पक्षांकडूनही या नियुक्तीला विरोध केला जात आहे.

याशिवाय क्लॉडियो दुरीगॉन यांनी एका बागेला इटलीचा दिवंगत हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याच्या भावाचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुरीगॉन यांचा पक्षदेखील मेलोनी यांच्या सरकारचा भाग आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते या निर्णयांमुळे संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांवर गदा आली आहे. या अधिकारांमध्ये स्पष्टपणे नोंदवलेले आहे की, सार्वजनिक सभा रोखता येणार नाहीत. दरम्यान, देशाची तिजोरी रिकामी आहे. महागाई वाढत चालली आहे. आणि वीज बिल कमी करण्याचे आश्वासनही पुर्ण केले गेलेले नाही. त्यामुळे मेलोनी लोकांमध्ये फुट पाडण्याचा अजेंडा चालवत आहेत. खऱ्या मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मेलोनी असे निर्णय घेत असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT