Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानच्या भवितव्याचा आज होणार फैसला

जूनपर्यंत पाकिस्तान (Pakistan) फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला पाठिंबा देत आला आहे. त्यामुळे आता याच कारवायांमुळे त्याच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. जूनपर्यंत पाकिस्तान (Pakistan) फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतरही या यादीतून बाहेर पडण्याची शाश्वती नसल्याचे देखील तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिरिक्त निकषांनुसार काही टार्गेट्स अपूर्ण राहिली आहेत. पॅरिसस्थित (Paris) जागतिक संस्था FATF मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा यावर देखरेख करते. (It is learned that Pakistan will be on the grey list of the Financial Action Task Force till June)

दरम्यान, FATF ला शुक्रवारी म्हणजे आज बैठक घ्यावी लागणार आहे. ऑक्टोबर 2019 पर्यंत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला कृती आराखडा देण्यात आला होता. 'द डॉन'च्या वृत्तानुसार, FATF च्या बैठकीचे समारोपीय सत्र शुक्रवारी होणार आहे. त्यांच्या अजेंड्यामध्ये पाकिस्तानच्या प्रगतीचा आढावा समाविष्ट आहे. वृत्तपत्रानुसार, पाकिस्तान आता जानेवारी 2023 च्या अखेरीस मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्याशी संबंधित 2021 ची कृती योजना पूर्ण करण्याच्या लक्ष्यावर काम करत आहे.

पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये का?

ऑक्टोबर 2021 मध्ये, FATF ने आपल्या 27-पॉइंट कृती योजनेतील 26 मुद्द्यांवर पाकिस्तानची प्रगती मान्य केली, परंतु इस्लामाबादला संयुक्त राष्ट्रांनी (UN) बंदी घातलेल्या दहशतवादी गटांच्या शीर्ष कॅडरच्या विरोधात दहशतवादी निधी पुरवठ्याची चौकशी आणि खटला चालवण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT