इम्रान सरकारच्या अडचणी वाढल्या; पाकिस्तान लष्कराचा TLP सोबत करार

विरोधी पक्षांकडूनही इम्रान खान यांच्यावर दबाव, तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परतण्याची शक्यता.
Imran Khan
Imran KhanDainik Gomntak
Published on
Updated on

पाकिस्तान मधिल इमराण खान सरकारला 2023 मध्ये 5 वर्ष पुर्ण होत आहे. तेथे 2023 मध्ये सार्वत्रीक निवडणुका होणार आहे. तेथे सध्या इमराण खान यांच्या नेतृत्वात सरकार आहे. आणि तेथे मोठ्या राजकिय उलथापालथ होण्यास सुरूवात झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे निर्वाचित सरकार पाडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने कट्टरपंथी इस्लामी संघटना तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) सोबत करार केला आहे.

Imran Khan
घटस्फोटाच्या दिवशीच पाकिस्तानातील खासदाराने 18 वर्षीय तरुणीशी बांधली लग्नगाठ

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा (Taliban) ताबा घेतल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने पुन्हा प्रॉक्सी युद्धासाठी आपले सहाय्यकांना तयार केले आहेत. देशांतर्गत राजकारणात या धार्मिक संघटनांचा वाढता हस्तक्षेप पाहता आपली मनमानी करण्याचा पाक लष्कराचा मनसुबा यातून पूर्ण होणार आहे. या कट्टरपंथी संघटनांच्या वाढत्या राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे पाकिस्तानमध्ये लष्करी राजवटीला एक निमित्त मिळाले आहे.

इम्रान खान आणि कमर जावेद बाजवा यांच्यातील मतभेद सर्वश्रुत

इंटरनॅशनल सिक्युरिटी स्टडीज प्रोग्राम 'गेटअवे हाऊस' मध्ये समीर पाटील यांनी लिहीलेल्या लेखानुसार 2021 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात TLP ने तीव्र निदर्शने केली. तेव्हा गुप्तचर संस्था ISI च्या प्रमुखाच्या नियुक्तीचा वाद चव्हाट्यावर आला होता. या मुद्द्यावरून इम्रान खान आणि आयएसआयचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यातील मतभेद चांगलेच जगजाहिर झाले होते.

राजकीय परिणाम उशिरा का होईना भोगावे लागतील

लष्कराने टीएलपीच्या निदर्शनांचा उपयोग लक्ष विचलित करण्यासाठी केला. तसेच नागरी राज्यकर्त्याला संदेश देण्यासाठी TLP सोबत करार केला जेणेकरून तो कधीही विसरणार नाही की लवकरच किंवा नंतर त्याला राजकीय परिणामांना सामोरे जावे लागेल.

इम्रान खानचा पक्ष पीटीआयमध्ये चिंतेत

विरोधी पक्षांकडूनही इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर दबाव वाढत आहे, विशेषत: माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्रानचा पक्ष पीटीआय आता चिंतेत आहे. 2023 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा फटका सहन करावा लागणार असल्याने यावेळी पाकिस्तानी लष्कराचे छत्र मिळण्याची शक्यता कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com